Resident Doctors Call off Strike :  देशपातळीवर सुरू असलेला निवासी डॉक्टरांचा संप अखेर मागे घेण्यात आला आहे. पदव्युत्तरच्या प्रथम वर्षांच्या विद्यार्थ्यांचे  नीटचे (NEET) समुपदेशन रखडल्याने 27 नोव्हेंबरपासून निवासी डॉक्टरांचा हा संप सुरू होता. सध्या दिल्लीत कोरोना रुग्णांची वाढती संख्या हा चिंतेचा विषय आहे. त्यामुळे डॉक्टरांनी हे आंदोलन मागे घेतले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांच्याशी चर्चा झाल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आल्याची माहिती दिल्ली डॉक्टर एसोसिएशनचे अध्यक्ष डॉ. मनीष यांनी सांगितले. दरम्यान, देश पातळीवरील निवासी डॉक्टरा जरी आपला संप आज दुपारी 12 वाजल्यापासून मागे घेणार असले तरी, महाराष्ट्रातील निवासी डॉक्टर मात्र संपावर ठाम आहेत.


देशात निवासी डाॅक्टरांनी संप मागे घेतला असला तरी महाराष्ट्रात संप सुरुच राहणार असल्याचं सेंन्ट्रल मार्डचे अध्यक्ष डाॅ अविनाश दहिफळे यांनी सांगितले आहे. जोपर्यंत स्टेट काऊन्सिलिंगचा मुद्दा मार्गी लागत नाही, सोबतच एचओच्या पोस्ट भरल्या जात नाहीत, तोपर्यंत संप सुरुच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. राज्याकडून कोणतीच काऊन्सिलिंग प्रक्रिया सुरु करण्यात आली नाही. ही सुरु केल्यास विद्यार्थ्यांचा वेळ वाचू शकतो असेही दहिफळे म्हणाले.


दिल्लीमध्ये दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे आज दुपारी 12 वाजेपर्यंत आमचे आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा निवासी डॉक्टरांनी केली आहे. आरोग्य मंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर त्यांच्याकडून आश्वासन देण्यात आल्याची माहिती अध्यक्ष डॉ. मनीष यांनी दिली आहे. फेडरेशन ऑफ रेजिडेंट डॉक्टर्स एसोसिएशन ऑफ इंडिया (FORDA) यांच्या नेतृत्वात हे आंदोलन केले जात आहे. 27 नोव्हेंबरला हे आंदोलन सुरू झाले होते. आम्ही सुप्रीम कोर्टापर्यंत मार्च काढण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, पोलीस आणि डॉक्टरांमध्ये यावरुन बाचाबाची झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. दरम्यान, येत्या 6 जानेवारीला  याबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यानंतर नीटच्या परिक्षेच्या तारखेबाबत निर्णय घेतला जाईल असे आश्वासन आरोग्यमंत्र्यांनी दिले आहे. दरम्यान कोरोनाचे रुग्ण देखील वाढत असल्याने आंदोलन मागे घेण्याचा निर्मय घेतल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. तसेच दिल्लीत पोलिसांकडून निवासी डाॅक्टरांवर दाखल केलेले गुन्हे मागे घेण्यात येमार आहेत. केंद्र सरकारकडून दिल्लीत झालेल्या प्रकाराबद्दल माफी देखील मागण्यात आली आहे.


नीटचे समुपदेशनाला होत असलेल्या दिरंगाईबाबत सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान पोलीस आणि आंदोलक यांच्यात सोमवारी झटापट झाली होती. यामध्ये अनेक लोक जखमी झाले होते. त्यामुळे वातावरण चिघळण्याची शक्यता निर्माण झाल्याने केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी मंगळवारी डॉक्टरांच्या शिष्टमंडळासोबत चर्चा केली. या बैठकीदरम्यान केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी काही निवासी डॉक्टरांची भेट घेऊन पोलिसांच्या असभ्यतेबद्दल खेद व्यक्त केला आहे. तसेच आंदोलकांना त्यांनी आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


दरम्यान, या आंदोलनाचे पडसाद राज्यात उमटले आहेत. आजपासून असून मुंबईतील निवासी डॉक्टरांनी आंदोलनास सुरूवात केली आहे. त्यानुसार मुंबईतील महत्त्वाच्या रूग्णालयाती निवासी डॉक्टरांनी करोना सेवा वगळता इतर सर्व सेवा बंद केल्या आहेत.


महत्त्वाच्या बातम्या: