Sanjay Raut Allegation on BJP : छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरील हल्ल्याचा निषेध व्यक्त करणं हा देशद्रोहाचा गुन्हा कसा असू शकतो, असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. तसेच राज्यातही या गुन्ह्याबद्दल आवाज उठवणं गरजेचं आहे. केवळ राजकारणासाठी शिवरायांचा वापर करु नका, असंही भाजपला संबोधून शिवसेना खासदार संजय राऊतांनी वक्तव्य केलं आहे. देशद्रोह खूप स्वस्त झालेला आहे. या देशात बीजेपी शासित राज्यात काही झालं तरी गुन्हा दाखल होतो, असंही संजय राऊत म्हणाले.


खासदार संजय राऊत म्हणाले की, कर्नाटक बेळगावमध्ये आजही महाराष्ट्र एकीकरण समितीचे 38 तरुण तुरुंगात आहेत. त्यांचा गुन्हा एवढाच आहे की छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान झाला विटंबना झाली त्यानंतर त्यांनी निषेध केला. गुन्हे दाखल करू शकता?मात्र त्यांच्यावर देशद्रोह गुन्हा दाखल केला जातो.  देशात भारतीय जनता पक्षाचे राज्य आहे, तिथे देशद्रोह सारखा गुन्हा होऊ शकतो का? देशद्रोहाचा गुन्हा थोडा स्वस्त झाला आहे का? छत्रपती शिवाजी महाराज कोण होते हे तुम्हाला माहित नाही का? असे सवाल राऊत यांनी केले.


राऊत म्हणाले की, एका बाजूला काशीमध्ये प्रधानमंत्री छत्रपती शिवाजी महाराज शौर्याचा पुरस्कार करतात आणि त्यात छत्रपतीचा अपमान होतो म्हणून बेळगावमध्ये रस्त्यावर उतरतात महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारने ही बाब गांभीर्याने घेतली पाहिजे, असं ते म्हणाले.  मुंबईत बसून हवेत गोळीबार करू नये.  त्यांनी हे खरमरीत पत्र लिहिण्याच्या भानगडीत पडू नये, कठोर पावले उचला. 38 तरुण आहेत सर्व कायदेशीर बाबी मांडण्यासाठी महाराष्ट्र सरकारने वकील द्यावा. कायदेशीर बाजू त्याची सांभाळावे अशी माझी राज्य सरकारकडे मागणी आहे, असं राऊत म्हणाले.


भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या वक्तव्यावर बोलताना ते म्हणाले की,  माणसाचं मन भरकटलं की भरकटलेल्या मनाची माणसे गांजा प्यायल्यासारखे बोलतात.  राजकारणात विरोधी पक्ष ज्या पद्धतीने भरकटलेला आहे. ते पाहता त्यांच्याकडून कोणत्या वक्तव्याची अपेक्षा करणार असं ते म्हणाले. सुधीर मुनगंटीवार यांना मी संयमी नेते समजत होतो. मी त्यांची भाषणे पाहतो. अभ्यासू नेते समजत होतो, असंही राऊत म्हणाले.  


इतर महत्वाच्या बातम्या


शिवरायांच्या पुतळ्याच्या विटंबनेचा निषेध केला, हा काय देशद्रोह झाला? सामनातून सवाल


Karnatak Bandh : कन्नड संघटनांनी पुकारलेला कर्नाटक बंद मागे; महाराष्ट्र एकीकरण समितीवर बंदी? मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले...