एक्स्प्लोर

Delhi Red Fort Blast: दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात मोठा खुलासा; बॉम्ब बनवण्यासाठी पीठ दळण्याच्या मशीनचा वापर, कॅब ड्रायव्हरच्या घरातून साहित्य जप्त

Delhi Red Fort Blast:  जम्मू आणि काश्मीरमधील पुलवामा येथील रहिवासी गनाई, फरीदाबादमधील त्यांच्या भाड्याच्या खोलीत एका पिठाच्या गिरणीच्या मदतीने युरिया बारीक दळत असत आणि नंतर ते रसायन तयार करण्यासाठी इलेक्ट्रिकल मशीनने शुद्ध करत असत.

Delhi Red Fort Blast: दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार ब्लास्ट प्रकरणाच्या तपासात मोठा धागा सापडला आहे. अटक आरोपी मुजम्मिल शकील गनईने स्फोटक तयार करण्यासाठी आटा चक्की आणि इलेक्ट्रिकल मशीनचा वापर केल्याचे समोर आले आहे. तपासादरम्यान हरियाणातील फरीदाबादमध्ये एका टॅक्सी ड्रायव्हरच्या घरातून ही आटा चक्की आणि मशीन जप्त करण्यात आली आहेत.

Delhi Red Fort Blast: फरीदाबादमधील भाड्याच्या खोलीत बनत होते स्फोटके

पुलवामा (जम्मू-काश्मीर) येथील रहिवासी गनई फरीदाबादमधील भाड्याच्या खोलीत आटा चक्कीच्या मदतीने युरिया बारीक दळत होता आणि नंतर इलेक्ट्रिकल मशीनच्या साहाय्याने त्याचे रिफायनिंग करून रासायनिक मिश्रण तयार करत होता. ९ नोव्हेंबर रोजी पोलिसांनी याच ठिकाणावरून ३६० किलो अमोनियम नायट्रेट आणि अन्य स्फोटक सामग्री जप्त केली होती. चौकशीत गनईने कबूल केले की तो याच पद्धतीने युरियातून अमोनियम नायट्रेट वेगळे करून बराच काळ स्फोटक तयार करत होता. तो फरीदाबादमधील अल-फलाह विद्यापीठात डॉक्टर म्हणून कार्यरत होता.

Delhi Red Fort Blast: टॅक्सी ड्रायव्हरही ताब्यात; NIA चौकशी सुरू

ज्या टॅक्सी ड्रायव्हरच्या घरातून उपकरणे जप्त झाली, त्यालाही NIAच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. ड्रायव्हरने चौकशीत सांगितले की त्याची गनईशी ओळख सुमारे चार वर्षांपूर्वी झाली होती, जेव्हा तो आपल्या मुलाच्या उपचारासाठी अल-फलाह मेडिकल कॉलेजमध्ये आला होता.

Delhi Red Fort Blast: लाल किल्ल्याजवळील कार ब्लास्टमध्ये १५ ठार

लाल किल्ल्याजवळ हुंडई i20 कारमध्ये झालेल्या आत्मघाती हल्ल्यात १५ जणांचा मृत्यू झाला होता. कार चालवणारा आत्मघाती हल्लेखोर उमर उन नबी घटनास्थळी ठार झाला. तो काश्मीरचा रहिवासी आणि पेशाने डॉक्टर होता. उमरही अल-फलाह विद्यापीठाशी जोडलेला होता.

Delhi Red Fort Blast: ब्लास्टपूर्वीच काश्मीर पोलिसांनी उघड केला होता दहशतवादी मॉड्यूल

स्फोटाच्या काही तास आधीच जम्मू-काश्मीर पोलिसांनी पाकिस्तानस्थित जैश-ए-मोहम्मद आणि अल-कायदा-संबंधीत अन्सार गझवत-उल-हिंदशी जोडलेल्या ‘व्हाइट कॉलर’ दहशतवादी मॉड्यूलचा भंडाफोड केला होता. या कारवाईत २,९०० किलो स्फोटक सामग्री जप्त झाली होती, ज्यात अमोनियम नायट्रेटही होते. हीच सामग्री दिल्ली ब्लास्टमध्ये वापरली गेल्याची शक्यता तपास यंत्रणा व्यक्त करत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर
Maharashtra Live News Updates: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर
गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार
गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार
नीट पेपरफोड्यांच्या टोळीचा ओळख लपवण्यासाठी WhatsApp ग्रुपला ‘FIFA World Cup 2026’ नाव अन् ‘कैलाश-शिवालिक’ कोड
नीट पेपरफोड्यांच्या टोळीचा ओळख लपवण्यासाठी WhatsApp ग्रुपला ‘FIFA World Cup 2026’ नाव अन् ‘कैलाश-शिवालिक’ कोड
Mecca Defence Pact: पाकिस्तान, सौदी अरेबिया अन् तुर्कीची संरक्षण करारावर स्वाक्षरी; एकावरचा हल्ला तिघांवर मानला जाणार! संयुक्त प्रशिक्षण, सुरक्षा सहकार्य वाढणार, भारताची किती डोकेदुखी वाढली?
पाकिस्तान, सौदी अरेबिया अन् तुर्कीची संरक्षण करारावर स्वाक्षरी; एकावरचा हल्ला तिघांवर मानला जाणार! संयुक्त प्रशिक्षण, सुरक्षा सहकार्य वाढणार, भारताची किती डोकेदुखी वाढली?

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार
गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार
नीट पेपरफोड्यांच्या टोळीचा ओळख लपवण्यासाठी WhatsApp ग्रुपला ‘FIFA World Cup 2026’ नाव अन् ‘कैलाश-शिवालिक’ कोड
नीट पेपरफोड्यांच्या टोळीचा ओळख लपवण्यासाठी WhatsApp ग्रुपला ‘FIFA World Cup 2026’ नाव अन् ‘कैलाश-शिवालिक’ कोड
Mecca Defence Pact: पाकिस्तान, सौदी अरेबिया अन् तुर्कीची संरक्षण करारावर स्वाक्षरी; एकावरचा हल्ला तिघांवर मानला जाणार! संयुक्त प्रशिक्षण, सुरक्षा सहकार्य वाढणार, भारताची किती डोकेदुखी वाढली?
पाकिस्तान, सौदी अरेबिया अन् तुर्कीची संरक्षण करारावर स्वाक्षरी; एकावरचा हल्ला तिघांवर मानला जाणार! संयुक्त प्रशिक्षण, सुरक्षा सहकार्य वाढणार, भारताची किती डोकेदुखी वाढली?
Maratha Reservation: अपवादात्मक परिस्थितीत 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येते; मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकारचा मोठा युक्तिवाद, न्यायालयात नेमकं काय घडलं?
अपवादात्मक परिस्थितीत 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येते; मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकारचा मोठा युक्तिवाद, न्यायालयात नेमकं काय घडलं?
Mumbai High Court On FDA: तुम्ही डास मारण्यासाठी तलवारीचा वापर करताय; मुंबई उच्च न्यायालयाच्या FDAला कानपिचक्या, पुन्हा काय घडलं?
तुम्ही डास मारण्यासाठी तलवारीचा वापर करताय; मुंबई उच्च न्यायालयाच्या FDAला कानपिचक्या, पुन्हा काय घडलं?
Thailand Crime: नववीच्या विद्यार्थ्याचे भयंकर कृत्य, आधी घरात आजी-आजोबा, नंतर शाळेत अंदाधुंद गोळीबार; 8 जणांचा दुर्दैवी अंत, 15 जखमी
नववीच्या विद्यार्थ्याचे भयंकर कृत्य, आधी घरात आजी-आजोबा, नंतर शाळेत अंदाधुंद गोळीबार; 8 जणांचा दुर्दैवी अंत, 15 जखमी
Ramandeep Singh Married to Charlie Chauhan : भारतीय क्रिकेटरने गुपचूप केलं लग्न, 7 वर्षांनी मोठ्या अभिनेत्रीशी बांधली लग्नगाठ; अर्शदीप सिंगने शेअर केला फोटो, कोण आहे 'ती'?
भारतीय क्रिकेटरने गुपचूप केलं लग्न, 7 वर्षांनी मोठ्या अभिनेत्रीशी बांधली लग्नगाठ; अर्शदीप सिंगने शेअर केला फोटो, कोण आहे 'ती'?
Embed widget