Delhi Police Special Cell : 26 जानेवारी पूर्वी दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) दहशतवादी हल्ल्याचा (Terrorist Attack) मोठा कट उधळून लावला आहे. दिल्ली पोलिसांनी जहांगीरपुरी (Jahangirpuri) येथून दोन दहशतवाद्यांना अटक (Two Terrorist Arrested) केली होती. हे दोघे ISI साठी काम करत असल्याचं चौकशीमध्ये समोर आले आहे. त्यामुळे दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने प्रजासत्ताक दिनापूर्वी दहशतवादी हल्ल्याचा मोठा कट उघडकीस आणला आहे. जहांगीरपुरी येथून अटक करण्यात आलेल्या संशयितांची चौकशी केल्यानंतर दिल्ली पोलिसांनी हरकत उल अन्सार आणि खलिस्तान टायगर फोर्स यांचे संबंध असल्याचा खुलासा केला आहे. हे दोन्ही दहशतवादी गट पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISI च्या आश्रयाखाली तयार करण्यात आली आहे, ज्याचा उद्देश भारतात दहशत पसरवणे आहे, असेही दिल्ली पोलिसांच्य स्पेशल सेलने सांगितलं आहे.


तीन तुकडे केलेला एक मृतदेह आढळला


जहांगीरपुरी येथून अटक करण्यात आलेल्या संशयितांकडून हातबॉम्ब जप्त करण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांनी भालस्व डेअरीवर छापेमारी केली आणि दोन संशयित दहशतवाद्यांना अटक केली. दोघांनी दिलेल्या माहितीवरून भालसवा नाल्यातून एक मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. नाल्यामध्ये एका मृतदेहाचे तीन अवशेष आढळून आले आहेत. या दोन्ही संशयितांनीच ही हत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे.


पोलिसांकडून दोन संशयितांना अटक


दिल्ली पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी जगजीत उर्फ ​​जग्गा आणि नौशाद नावाच्या दोन संशयितांना अटक केली होती. नौशाद पाकिस्तानातील हरकत-उल-अन्सार या दहशतवादी संघटनेशी संबंधित आहे. त्याचा हस्तक पाकिस्तानात असल्याची माहिती आहे. जगजीतचा परदेशात असलेला खलिस्तानी दहशतवादी अर्शदीप डल्लाशी संबंध आहे. अर्शदीप डल्ला खलिस्तान टायगर फोर्सचा दहशतवादी आणि पंजाबचा गुंड आहे.


हत्या करताना बनवला व्हिडीओ


दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने छापा टाकून मृतदेह ताब्यात घेतला होता. जहांगीरपुरी येथील नाल्यामध्ये तीन तुकडे केलेला मृतहेद आढळला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जगजाती आणि नौशाद यांनी एका व्यक्तीची गळा चिरून हत्या केला आणि त्याचा व्हिडीओ बनवला. नंतर तो व्हिडीओ त्याच्या हँडलरला पाठवला. दिल्ली पोलीस ठार झालेल्या व्यक्तीची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.


महत्त्वाच्या इतर बातम्या


Man With 100 Wives : 100 बायकांबरोबर थाटला संसार, 500 मुलांचा 'बाप'; 'या' व्यक्तीची सर्वदूर चर्चा