नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांनी पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गने हिने ट्विटरवर अपलोड केलेल्या टूलकिटबाबत गुन्हा दाखल केला आहे. शेतकरी आंदोलनाबद्दल ग्रेटाने एक ट्वीट केलं होतं. ज्यात या टूलकिटचा उल्लेख करण्याता आला होता.
दिल्ली सीमाभागात झालेल्या हिंसाचारानंतर दिल्ली पोलिस सोशल मीडियावर करडी नजर ठेऊन आहे. आतापर्यंत पोलिसांनी 300 सोशल मीडिया हँडल निलंबित केले आहे. यात (ग्रेटाचं नाव न घेता) तीने अपलोड केलेल्या टूलकिट वर नजर ठेवली जात आहे. या टूलकिटच्या माध्यमातून वातावरण बिघडवण्याचा कट रचला जात होता. भारत सरकारची प्रतिमा खराब करण्याचा डाव होता. याबाबत दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कलम 124 ए (राजद्रोह), 153 ए, 153 आणि 120 बी अंतर्गत फिर्याद दाखल केली. एफआयआरमध्ये ग्रेटाचे नाव लिहिलेले नाही, आम्ही तिच्या ट्विट आणि टूलकिटवर गुन्हा नोंदवून या प्रकरणाचा तपास करत आहोत. दिल्ली पोलिसांचे सायबर सेल याचा तपास करत आहे.
पॉप गायिका रिहानानंतर, पर्यावरण कार्यकर्ता ग्रेटा थनबर्ग यांच्यासह अनेक जागतिक ख्यातनाम व्यक्तींनी शेतकरी आंदोलनाचे समर्थन केले. यावर भारताने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आपण आधी वस्तुस्थिती तपासून घ्यावी, असा इशारा परराष्ट्र मंत्रालयाने दिला आहे.
ग्रेटा थनबर्ग काय म्हणाली?
रिहानाच्या ट्वीटनंतर पर्यावरणवादी कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गनेही शेतकरी आंदोलनाविषयी ट्वीट केले. ग्रेटा यांनी ट्विटरवर लिहिले की, “आम्ही भारतात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलकांसोबत एकतेने उभे आहोत." ज्यांना मदत हवी आहे, त्यांच्यासाठी टूलकिट शेअर (सॉफ्टवेयर) केलं आहे. ग्रेटा थनबर्गला 2019 मध्ये अमेरिकन मॅगझिन टाईम्सने 'पर्सन ऑफ द इयर' म्हणून घोषित केले होते. ग्रेटा चर्चेत आली होती ज्यावेळी अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी ग्रेटाचा शाब्दिक चकमक झाली होती.
काय आहे प्रकरण?
तीन नवीन कृषी कायद्यांविरोधात शेतकरी गेल्या 70 दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करीत आहेत. येथे पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने तटबंदी केली आहे. सरकारने येथे इंटरनेट सेवाही बंद केली आहे.