ताब्यात घेतलेल्या आरोपीचं नाव इन्सा आहे, जो दिल्लीच्या लक्ष्मीनगर परिसरात राहतो. आरोपी राम रहीमच्या समर्थनार्थ घोषणा देत होता. तो सध्या पोलिसांच्या ताब्यात असून त्याची चौकशी सुरु आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
आरोपी स्प्लेंडर बाईकवरुन संसद भवनापर्यंत पोहोचला होता. त्याची बाईकही जप्त केली आहे. मात्र संसद परिसरात घुसण्याचा त्याचा नेमका उद्देश काय होता, याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.