नवी दिल्ली :  देशातील कोरोना संक्रमणाची परिस्थिती अत्यंत भयानक होत आहे. ऑक्सिजनच्या अभावी अनेक रुग्णांचा जीव धोक्यात आल्याचं दिसून येतंय. त्यातच आता दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात गंभीर स्थितीत असलेल्या 25 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ऑक्सिजनच्या अभावी या रुग्णांना आपला जीव गमवावा लागल्याचं सांगण्यात येतंय. अजूनही या रुग्णालयात 60 रुग्णांचा जीव धोक्यात असल्याचं सांगण्यात येतंय. 


सर गंगाराम रुग्णालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं की, ऑक्सिजनचा पुरवठा अजून केवळ दोनच तास चालेल. व्हेन्टिलेटर आणि बीआयपीएपी मशिन प्रभावीपणे काम करत नाहीत. त्यामुळे गंभीर स्थितीत असलेल्या 60 रुग्णांचा जीव धोक्यात आला आहे. 


 




दिल्लीत दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ होत आहे. त्यामुळे दिल्लीतील आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आला असून दिल्लीमध्ये बेड्स आणि ऑक्सिजनचा तुटवडा पडत असल्याचं दिसून येत आहे. गुरुवारी दिल्लीतील GTB रुग्णालयात एक आणिबाणीचा प्रसंग निर्माण होऊन ऑक्सिजनच्या पुरवठ्यात तुटवडा निर्माण झाला आणि त्यामुळे 500 रुग्णांचा जीव धोक्यात आला होता. पण या ठिकाणी वेळेत ऑक्सिजनचा टॅन्कर पोहोचला आणि या सर्व रुग्णाचा जीव वाचला. ही घटना ताजी असतानाच आज सर गंगाराम रुग्णालयात दुर्दैवी घटना घडली आहे. 


दिल्लीत गेल्या 24 तासात दिल्लीमध्ये 26,169 कोरोनाच्या नव्या रुग्णांची भर पडली आहे तर 306 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या दहा दिवसात दिल्लीत 1750 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 


महत्वाच्या बातम्या :