Delhi Ministers Resignation: दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) आणि आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दोघांचा राजीनामा स्वीकारला आहे. मनीष सिसोदिया यांच्याकडे अनेक विभागांची जबाबदारी होती. सत्येंद्र जैन तुरुंगात गेल्यानंतर मनीष सिसोदिया (Manish Sisodia) त्यांच्या विभागाचे काम पाहत होते. मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांच्याकडे दिल्ली सरकारच्या 33 पैकी 18 विभागांची जबाबदारी होती. सत्येंद्र जैन नऊ महिन्यांपासून तुरुंगात आहेत. दिल्ली मद्य धोरणाशी संबंधित प्रकरणात मनीष सिसोदिया यांना अटक झाल्यापासून विरोधी पक्षांनी केजरीवाल सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता. तसेच तुरुंगात असतानाही सत्येंद्र जैन हे आरोग्यमंत्री पदावर होते. या दोघांच्या राजीनाम्याबाबत दिल्लीचे पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी म्हटले आहे की, यामुळे काम थांबणार नाही आणि भाजप आपल्या योजनेत यशस्वी होणार नाही.
Delhi Ministers Resignation: भाजपने केजरीवाल यांच्या राजीनाम्याची केली मागणी
दिल्लीतील (Delhi) या दोन्ही मंत्र्यांनी राजीनामे दिल्यानंतर भाजप खासदार मनोज तिवारी यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मनोज तिवारी ट्वीट करत म्हणाले आहे की, ''सुप्रीम कोर्टाने फाटकारल्यानंतर आम आदमी पक्षाची झोप उडाली आहे. शेवटी मनीष सिसोदिया (Manish Sisodia) आईनी सत्येंद्र जैन यांना राजीनामे द्यावे लागले आहेत. केजरीवाल जी तुम्ही नैतिकतेच्या आधारावर तुम्ही राजीनामा द्यायला हवा.''
यावर कपिल मिश्रा यांनीही ट्वीट करत प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, "दिल्लीची जनता जिंकली, भ्रष्ट मंत्री मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांना मंत्रिमंडळाचा राजीनामा द्यावा लागला. तुरुंगातून सरकार चालवण्याचे पाप थांबावे लागले. भ्रष्ट मंत्र्यांना वाचवण्याचे केजरीवालांचे सर्व प्रयत्न अयशस्वी झाले."
Delhi Ministers Resignation: दिल्ली सरकारमधील आतापर्यंत तीन मंत्र्यांचे राजीनामे
राजेंद्र पाल गौतम, मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांच्यासह दिल्लीतील एकूण तीन मंत्र्यांनी आतापर्यंत राजीनामा दिला आहे. गेल्या वर्षी राजेंद्र पाल गौतम यांनी एका वादग्रस्त वक्तव्यानंतर मुख्यमंत्री केजरीवाल यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला होता.