Sanjeev Kapoor News : सुप्रसिद्ध शेफ संजीव कपूरने एअर इंडियाच्या फ्लाईटमध्ये देण्यात येत असलेल्या जेवणाबद्दल संताप व्यक्त करत चांगलीच टीका केली आहे. नागपूरवरुन मुंबईला येत असताना विमानात देण्यात येणाऱ्या जेवणाबद्दल अत्यंत वाईट अनुभव आल्याचं संजीव कपूरने त्याच्या सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलंय. विमानात देण्यात येणारं जेवण अत्यंत थंड असून त्याचं कॉम्बिनेशनही चुकीचं असल्याचं सांगत संजीव कपूर यांनी एअर इंडियाच्या व्यवस्थापनावर टीका केली आहे. 


संजीव कपूरने जेवणाबद्दल त्याला आलेल्या अनुभवाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यामध्ये दिसणारे चिकन टिक्का हे अतिशय थंड होतं, सँडविचच्या मधल्या भागात काहीच नव्हतं, एक गोड पदार्थ होता, त्यातही साखरेचा थोडासाच अंश होता असं संजीव कपूरने म्हटलं आहे. 


संजीव कपूरने केलेल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, "वेक अप एअर इंडिया, नागपूर-मुंबई 0740 फ्लाइट. वॉरटमेलन काकडी, टोमॅटो आणि शेवसह कोल्ड चिकन टिक्का. सॅंडविचमध्ये नावालाच वापरलेली कोबी आणि मायो, यलो ग्लेज आणि गोड क्रिमचे सुगर सिरप स्पॉंज."


 




गेल्या आठवड्यात, तृणमूल काँग्रेसच्या खासदार मिमी चक्रवर्ती यांनी विमानातील जेवणात केस सापडल्यानंतर एमिरेट्सला विमान व्यवस्थापनाला फटकारलं होतं. अभिनेता-राजकारिणीने सांगितले की तिला एमिरेट्सच्या फ्लाइटमध्ये क्रोइसंटमध्ये केस सापडल्यानंतर तिने त्या संदर्भातील फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. 


गेल्या महिन्यात, एअर इंडियाच्या एका प्रवाशाने दावा केला होता की त्याला फ्लाइटमध्ये देण्यात आलेल्या जेवणात खडा सापडला होता. या खड्याचे फोटो त्याने ट्विटरवर शेअर करत म्हटलं होतं की, विमान कंपनीने केलेला हा निष्काळजीपणा अस्वीकारार्ह आहे. "तुम्हाला खडेमुक्त अन्नाची खात्री करण्यासाठी संसाधने आणि पैशांची गरज नाही. आज एआय 215 फ्लाइटमध्ये मला माझ्या जेवणात हेच मिळाले. ही गोष्ट क्रू मेंबरच्या ध्यानात आणून दिली आहे. अशा प्रकारची निष्काळजीपणा अस्वीकार्य आहे." 


एअर इंडियाची मालकी गेल्या वर्षी जानेवारीमध्ये, त्याच्या संस्थापकांच्या म्हणजे टाटा समूहाच्या हातात परत आली होती. हा व्यवहार सुमारे 18,000 कोटी रुपयांचा होता.  


ही बातमी वाचा: