एक्स्प्लोर

Ghaziabad: दिल्ली-मेरठ एक्स्प्रेस वेवर स्कूल बस आणि कारचा भीषण अपघात; सहा जणांचा जागीच मृत्यू

Uttar Pradesh: नोएडामध्ये एका खासगी शाळेची बस आणि कारचा अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

Uttar Pradesh: उत्तर प्रदेशाच्या गाझियाबादमधील दिल्ली-मेरठ एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात झाला. मंगळवारी (11 जुलै) सकाळी नोएडामध्ये एका खासगी शाळेची बस आणि कारची धडक झाली. या अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे, तर दोन जणांची प्रकृती गंभीर आहे. सकाळी 7 च्या सुमारास नोएडाजवळ हा अपघात (UP Road Accident) घडला.

दिल्ली (Delhi) आणि उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) सीमेवर हा अपघात झाला. या अपघातामध्ये कारचं मोठं नुकसान झालं आहे. या अपघाताचा पुढील तपास उत्तर प्रदेश पोलिसांकडून (Uttar Pradesh Police) सुरू आहे. बस चालकाच्या चुकीमुळे हा अपघात घडल्याचं पोलिसांनी सांगितलं. दिल्लीजवळीत गाझीपूर येथील सीएनजी पंपावरुन बस चालकाने गॅस भरला आणि नंतर उलट्या दिशेने (Wrong Direction) त्याने बस काढली. चुकीच्या दिशेने धावणाऱ्या स्कूल बसने SUV कारला जोरदार धडक दिली. या कारमधून आठ जण प्रवास करत होते, त्यातील सहा जणांचा जागीच मृत्यू झाला, दोन जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना जवळच्या रग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

सुदैवाने स्कूल बसमध्ये एकही विद्यार्थी नव्हता, बसमध्ये फक्त चालकच होता. नोएडाच्या बालभारती शाळेची ही बस होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे 8 किलोमीटरपर्यंत बस चुकीच्या बाजूने धावली. प्रेमपाल असं बस चालकाचं नाव असून तो नशेत असल्याची माहितीही समोर येत आहे. पोलिसांनी बस चालकाला ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सध्या सुरू आहे.

अपघातात मृत पावलेले कुटुंब हे मूळचे मेरठचे होते, ते खाटू श्यामच्या दर्शनासाठी निघाले असता कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला. या अपघाताचे सीसीटीव्हीही आता समोर आले आहेत. याआधी सोमवारी (10 जुलै) रात्री उत्तर प्रदेशच्या प्रतापगडमध्येही अपघात झाला होता. यात टेम्पो आणि टँकर यांच्यात भीषण अपघात झाला होता. या अपघातात 12 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता, 5 जण गंभीर जखमी झाले आहेत.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी या अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. मृतांच्या आत्म्याला शांती लाभो, असं ट्वीट करत त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जखमींना योग्य उपचारासाठी रुग्णालयात नेण्याच्या सूचना दिल्या, तसेच ते लवकरात लवकर बरे व्हावे, यासाठी त्यांनी प्रार्थना देखील केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नरेंद्र यादव (45), त्यांची पत्नी अनिता (42), पहिला मुलगा कार्तिक (15), दुसरा मुलगा हिमांशू (12) हे अपघातात ठार झाले. नरेंद्र यादव यांचा भाऊ धर्मेंद्रची पत्नी बबिता (38) आणि मुलगी वंशिका (7) यांचाही अपघातात मृत्यू झाला. तर धर्मेंद्र (48) आणि त्यांचा मुलगा आर्यन (8) हे गंभीर जखमी झाले आहेत. धर्मेंद्र हे गावी शेती करायचे, तर नरेंद्र हे इलेक्ट्रॉनिकचं दुकान चालवायचे.

हेही वाचा:

Health Tips: रात्री झोपताना अस्वस्थ वाटतं? शांत झोप लागण्यासाठी करा 'या' गोष्टी

महत्त्वाच्या बातम्या

सणासुदीच्या काळात साखरेनं दिला दराचा चटका, महिनाभरातच तब्बल 15 टक्क्यांची वाढ, दर वाढण्याचं नेमकं कारण काय?
सणासुदीच्या काळात साखरेनं दिला दराचा चटका, महिनाभरातच तब्बल 15 टक्क्यांची वाढ, दर वाढण्याचं नेमकं कारण काय?
Lok Sabha Monsoon Session : संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
घर घेण्याचं स्वप्न होणार साकार! RBI न घेतला मोठा निर्णय, ग्रामीण बँका आता ग्राहकांना देणार 3 कोटी रुपयांचं गृहकर्ज
घर घेण्याचं स्वप्न होणार साकार! RBI न घेतला मोठा निर्णय, ग्रामीण बँका आता ग्राहकांना देणार 3 कोटी रुपयांचं गृहकर्ज
Rahul Gandhi : भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर

व्हिडीओ

Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lok Sabha Monsoon Session : संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Rahul Gandhi : भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Prithviraj Chavan: इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
Embed widget