Chandni Chowk Fireदिल्लीमधील प्रसिद्ध चांदनी चौकातील लाजपत राय मार्केटमध्ये आज भीषण आग लागली. आग कशी लागली याबाबत अद्याप माहिती मिळू शकली नसून शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अग्निशमन दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.


दिल्ली अग्निशमन सेवेचे सहाय्यक विभागीय अधिकारी राजेश शुक्ला यांनी सांगितले की, "एकूण 105 दुकानांना आग लागली. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. यामध्ये कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नाही. 



अग्निशमन दलासह स्थानिक लोकही मोठ्या संख्येने उपस्थित असून ते मदतकार्यात गुंतले आहेत. अग्निशमन विभागाने सांगितले की, आम्हांला आगीची माहिती पहाटे 5.45 च्या सुमारास मिळाली. जवळपास 60 दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी आल्याचे समजते. या अपघातात कोट्यवधी रुपयांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.


दिल्लीतील चांदणी चौक हा बाजार देशभर प्रसिद्ध आहे. इलेक्‍ट्रॉनिक वस्तूंशिवाय येथे कपड्यांची दुकानेही मोठ्या प्रमाणात आहेत. या बाजारात दररोज लाखो लोक खरेदीसाठी येतात. चांदणी चौक हा परिसर पराठा गल्ली आणि अरुंद गल्ल्यांसाठीही प्रसिद्ध आहे.


महत्त्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha