Delhi RTO Number Controversy : नवी दिल्ली : परिवहन विभागाच्या गलथान कारभारामुळे दिल्लीमधील एका मुलीला घराबाहेर पडणे कठीण झाले होते. वाढदिवसाची भेट म्हणून वडिलांकडून मिळालेल्य दुचाकीच्या नंबरमध्ये परिवहन विभागाकडून (आरटीओ, RTO) आलेल्या अक्षरांमुळे या मुलीवर ही वेळ आली होती. संबंधित मुलीने याबाबत परिवहन विभागाकडे त्यांच्याकडून झालेली चूक दुरूस्त करण्याची मागणी केली होती. परंतु, विभागाने त्याला नकार देत टाळाटाळ केली होती. अखेर दिल्ली महिला आयोगाने (Delhi Commission for Women) या प्रकरणाची दखल घेत परिवहन विभागाला नोटीस पाठविली आहे. 


दिल्लीमधील प्रीती (बललेले नाव) या मुलीने वाढदिवसाचे गिफ्ट म्हणून आपल्या वडिलांकडे दुचाकीची मागणी केली होती. वडिलांनी मुलीची इच्छा पूर्ण केली आणि एक दुचाकी बुक केली. इथपर्यंत सर्व ठीक होते. मात्र, या दुचाकीला मिळालेल्या क्रमांकामुळे प्रीती आणि तिच्या कुटुंबीयांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागले. प्रीतीला परिवहन कार्यालयाकडून मिळालेल्या क्रमांकामध्ये S.E.X.ही अक्षरे होती. या क्रमांकामुळे प्रीती आणि तिच्या कुटुंबीयांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागले. त्यामुळे तिने याबाबत परिवहन विभागात नंबर बदलून मिळण्यासाठी विनंती केली. परंतु, नियमांमुळे वाहन क्रमांक बदलता येणार नसल्याचे दिल्लीतील एका परिवहन अधिकाऱ्याने सांगितले. आतापर्यंत या सिरीजच्या शेकडो वाहनांना क्रमांक देण्यात आले असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. परिवहन विभाग त्या मुलीच्या मागणीची दखल घेत नसल्याचे पाहून दिल्ली महिला आयोगाने परिवहन विभागाला नोटीस पाठवून नवीन सिरीजमध्ये किती दुचाकींची नोंदनी झाली आहे, याची माहिती मागिविली आहे. 


दरम्यान, हा प्रकार समोर आल्यानंतर नव्या सिरीजमधील नंबर देणे बंद करण्यात आल्याची माहिती परिवहन विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने शनिवारी दिली. याबरोबरच दिल्ली महिला आयोगाच्या प्रमुख स्वाती मालीवाल म्हणाल्या की, " लोक   एवढ्या खालच्या पातळीवर आणि एवढी अपमानास्पद देत असलेली वागणूक त्या मुलीला सहन करावी लागली हे दुर्देव आहे. संबंधित मुलीला परत असा त्रास होऊ नये म्हणून परिवहन विभागाला हा प्रश्न सोडविण्यासाठी चार दिवसांचा वेळ दिला आहे. शिवाय  SEX हा शब्द आलेल्या सिरीजमध्ये जेवढ्या वाहनांची संख्या आहे त्याची आकडेवारी मागितली आहे." 



आयोगाच्या प्रमुख स्वाती मालीवाल यांनी सांगितले की, परिवहन विभागाला पाठविण्यात आलेल्या नोटीसीमध्ये विभागाला प्राप्त झालेल्या अशा सर्व तक्रारींचा तपशीलही मागवला आहे. 


दिल्लीमध्ये वाहन क्रमांकासाठी एक वेगळी पद्धत आहे. उदाहरणार्थ  DL 9 CAA 1111 या क्रमांकात  DL म्हणजे दिल्ली, पुढील सांकेतिक शब्द C हा वाहन प्रकार सांगणारा आहे. कार, एसयुव्हीसाठी C हा शब्द , दुचाकीसाठी S, इलेक्ट्रिक वाहनासाठी E, सार्वजनिक वाहतुकीतील बसेससाठी P, तीनचाकी रिक्षांसाठी R, टुरिस्ट परवानाधारक वाहनांसाठी T,पिक अप वाहनांसाठी V, भाडेतत्वावर असलेल्या वाहनांसाठी Y हे सांकेतिक अक्षर असतात. त्यामुळे दुचाकीवरील क्रमांकामुळे मोठा गोंधळ झाला असल्याचे दिसून येते. सध्याच्या दुचाकींच्या नोंदणीसाठी 'E' आणि 'X'ही अक्षरे आहेत. त्यामुळे संबंधित मुलीच्या दुचाकीला आलेल्या नंबरमध्ये SEX हा शब्द आला. 


नाहक त्रास होऊ लागल्यानंतर नंबर बदलून देण्याची मागणी केली होती. परंतु, नियमांमुळे वाहन क्रमांक बदलता येणार नसल्याचे दिल्लीती एका परिवहन अधिकाऱ्याने सांगितले होते. आतापर्यंत या सिरीजच्या शेकडो वाहनांना क्रमांक देण्यात आले असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले होते. परंतु, आता परिवहन विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, ज्याला या मालिकेतील नोंदणी क्रमांक मिळाला आहे त्याला तो बदलणे शक्य आहे. विभागाच्या लक्षात ही बाब आल्यानंतर या नोंदनीतील संपूर्ण मालिका बंद करण्यात आली असून ज्यांना यातील नंबर मिळाले आहेत त्यांनी मागणी केल्यास हे नंबर बदलता येतील असे त्यांनी त्या अधिकाऱ्याने सांगितले. 


संबंधित बातम्या 


नियमांनी थट्टा मांडली! दुचाकीवरील अजब नंबर प्लेटमुळे तरुणीला घराबाहेर पडणे झालंय कठीण