Omicron in Gujarat : ओमायक्रॉनचा (Omicron)  विळखा महाराष्ट्राभोवती घट्ट होऊ लागलाय महाराष्ट्रानजीकच्या गुजरातमध्येही ओमायक्रॉनचा शिरकाव झाला आहे. आधी कर्नाटक आणि आता गुजरातमध्ये ओमायक्रॉन व्हेरियंटचा शिरकाव झाल्यानं महाराष्ट्राच्या चिंतेत मात्र भर पडली आहे. झिम्बाब्वेहून परतलेल्या 72 वर्षीय वृद्धाला ओमायक्रॉन व्हेरियंटची लागण झाली आहे. त्यामुळे आता देशात देशात ओमायक्रॉनचे तीन रुग्ण झाले आहेत. दोन कर्नाटकमध्ये आणि एक गुजरातमध्ये आहे.


गुजरातच्या जामनगर येथील हा ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण आहे.  पीटीआय वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे. गुजरातच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे. या अगोदर कर्नाटकात ओमायक्रॉन या व्हेरियंटचे दोन रुग्ण आढळलेत. आफ्रिकेतून आलेले 66 वर्षीय आणि 46 वर्षीय रुग्ण ओमायक्रॉन व्हेरियंटनं संक्रमित आढळून आलेत. महाराष्ट्राच्या वेशीवर ओमायक्रॉनचे रुग्ण आढळल्यानं राज्यातही खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.


 





 कर्नाटकात ओमायक्रॉनचा (Omicron)  शिरकाव झाल्यानंतर आता सरकार आणि यंत्रणा सतर्क झाली आहे. ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीची बैठक झाली. या बैठकीत ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी विचारविनिमय करून नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे.


हाय रिस्क देशांतून 10 ते 30 नोव्हेंबर दरम्यान 3 हजार 136  प्रवासी सध्या आले आहेत. त्यातील 2 हजार 149 प्रवाशांची कोरोना चाचणी झाली आहे. तर त्याच्यांपैकी 10 प्रवासी हे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. पॉझिटिव्ह आलेल्या सर्व प्रवाशांचे नमुने जिनोम सिक्वेसिंगसाठी पाठवण्यात आले आहेत. सध्या या प्रवाशांच्या अहवालाकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. दरम्यान, या सगळ्यांचा जिनोम सेक्वेंसिंगचा अहवाल दोन दिवसांत येण्याची शक्यता असून या अहवालानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल, असं प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात आलं आहे. 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha




संबंधित  बातम्या :