Delhi Chemial Warehouse Fire : दिल्लीतील (Delhi) केमिकल गोदामांना भीषण आग (Fire) लागून मोठी दुर्घटना घडली आहे. पेंट (Paint) आणि केमिकल (Chemical) गोदामांना (Godown) आग लागून भीषण दुर्घटना घडली. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून आग (Delhi Alipur Fire Update) आटोक्यात आणण्यात आली आहे. या दुर्घटनेमध्ये 11 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. यासोबतच चार जण जखमी झाले आहेत. दुर्घटनेतील जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दिल्लीतल्या अलीपूरमध्ये ही घटना घडली आहे. मृतांची ओळख अद्याप पटली नसल्याची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.


केमिकल गोदामांना भीषण आग


दिल्लीतील अलीपूर निवासी भागातील अरुंद गल्ल्यांमध्ये पेंट आणि केमिकल फॅक्टरीला लागलेल्या भीषण आगीत 11 जणांचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत. दिल्ली अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मृतांना बाबू जगजीवन राम रुग्णालयात नेण्यात आले आहे. तर, चार जखमींना राजा हरिश्चंद्र रुग्णालयात नेण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही.


आजूबाजूची चार घरे आगीच्या भक्ष्यस्थानी


या अपघातात अनेकांचा निष्काळजीपणा समोर आला आहे. एका घरात केमिकलचे ड्रम टाकून रंग तयार करण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. आग इतकी भीषण होती की, आजूबाजूची चार घरे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास ही आग लागली आणि रात्री उशिरापर्यंत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू होते. अखेर, शुक्रवारी सकाळी आग आटोक्यात आणण्यात यश मिळालं.






आगीत होरपळून 11 जणांचा मृत्यू, 4 जण जखमी


दिल्लीतील अलीपूर येथील दयाल मार्केटमध्ये गुरूवारी 15 फेब्रुवारीला एका पेंट फॅक्टरीत आग लागली. रात्री उशिरापर्यंत या दुर्घटनेतत 7 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर शुक्रवार साकळपर्यंत मृतांच्या संख्येत वाढ झाली. शुक्रवारी सकाळी मृतांची संख्या 11 झाली आहे. चार जण जखमी झाले असून, त्यांना उपचारांसाठी राजा हरिश्चंद्र रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.


केमिकलमुळे स्फोट होऊन आग लागल्याचा अंदाज


आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 22 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. गुरुवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली. रात्री 9 वाजता आग आटोक्यात आणण्यात आली. केमिकल कारखान्यात स्फोट झाल्यानंतर आग लागल्याचे पोलिसांनी सांगितलं. आग इतकी भीषण होती की, आजूबाजूच्या काही घरांचेही नुकसान झालं आहे. कारखान्यात ठेवलेल्या केमिकलमुळे हा स्फोट झाल्याचं अधिकाऱ्यांचं मत आहे.