16 February In History : इतिहासात 16 फ्रेब्रुवारी रोजी अनेक महत्वाच्या घटना घडल्या आहेत. आज क्युबामध्ये फिडेल कॅस्ट्रो यांनी क्रांती करत सत्ता ताब्यात घेतली होती. तर भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांचे निधन झाले होते. 16 फेब्रुवारी हा दिवस बंगाली साहित्यातील प्रख्यात लेखक शरदचंद्र चट्टोपाध्याय यांचा जन्मदिन आहे. याशिवाय आजच्या दिवशी अनेक महत्त्वाच्या घटना घडल्या आहेत. 


1759 : फ्रेंचांनी मद्रासवरील ताबा सोडला


फ्रान्सने 16 फेब्रुवारी 1759 रोजी मद्रासवरील आपला ताबा सोडला आणि मद्रासवर ब्रिटिशांनी सत्ता प्रस्थापित केली होती . फ्रान्स आणि ब्रिटिशांमध्ये सुरु असलेले सेव्हन ईयर्स वॉर संपल्यांनंतर त्याचा परिणाम भारतातील फ्रेन्चांच्या राजवटीवर झाला होता. 


1937 : वॉलेस कॅरोथर्स यांना नायलॉनचे पेटंट मिळाले


वॉलेस ह्यूम कॅरोथर्स हे अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ होते, त्यांनी नायलॉनचा (Nylon) शोध लावला. आजच्याच दिवशी म्हणजे 16 फेब्रुवारी 1937 रोजी त्यांना नायलॉनचं पेटंट मिळालं. नायलॉन हे सुरुवातीला टूथब्रश बनवण्यासाठी वापरले जायचे.


1938 : बंगाली साहित्यिक शरदचंद्र चट्टोपाध्याय यांचे निधन


शरदचंद्र  चट्टोपाध्याय हे प्रसिद्ध बंगाली कादंबरीकार आणि लघुकथा लेखक होते. ते सर्वात लोकप्रिय बंगाली कादंबरीकार अशी त्यांची ओळख होती. तत्कालीन बंगालच्या समाज जीवनाचा आरसा त्यांच्या कलाकृतींतून दिसायचा. शरदचंद्र चटोपाध्याय यांची ओळख ही भारतातील सर्वकाळातील सर्वात लोकप्रिय आणि अनुवादित लेखक अशी आहे. 16 फेब्रुवारी 1938 रोजी त्यांचं निधन झाले होते. 


1944 : भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांचे निधन


धुंडिराज गोविंद फाळके ऊर्फ दादासाहेब फाळके (Dadasaheb Phalke) यांना भारतीय चित्रपटांचा जनक मानले जाते. 3 मे 1913 रोजी त्यांनी 'राजा हरिश्चंद्र' या पहिल्या मूकपटाची निर्मिती केली आणि भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ रोवली. दादासाहेब फाळके यांनी आपल्या 19 वर्षाच्या कारकिर्दीत 95 चित्रपटांची आणि 26 लघुपटांची निर्मिती केली. कलाकारांना त्यांच्या चित्रपटसृष्ठीतील योगदानाबद्दल दादासाहेब फाळके यांच्या नावाने पुरस्कार पुरस्कार दिला जातो. त्यांच्या सन्मानार्थ दिला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार हा चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रतिष्ठेचा सन्मान मानला जातो. 16 फेब्रुवारी 1944 रोजी त्यांचं निधन झालं. 


1956 : भारताचे महान शास्त्रज्ञ मेघनाद साहा यांचे निधन


मेघनाद साहा हे एक प्रसिद्ध भारतीय खगोलभौतिकशास्त्रज्ञ होते. साहा समीकरणाच्या प्रस्तुतीसाठी ते प्रसिद्ध आहेत. हे समीकरण ताऱ्यांमधील भौतिक आणि रासायनिक स्थिती स्पष्ट करते. त्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या विद्वानांच्या समितीने भारताच्या राष्ट्रीय शक दिनदर्शिकेतही सुधारणा केली. ही शकावली 22 मार्च 1957 (1 चैत्र 1879 शक) पासून लागू झाली. त्यांनी साहा इन्स्टिट्यूट ऑफ न्यूक्लियर फिजिक्स आणि इंडियन असोसिएशनची स्थापना केली. 


1959 : फिडेल कॅस्ट्रो यांनी क्युबाची सत्ता हाती घेतली


क्युबामध्ये साम्यवादी क्रांती करुन फिडेल कॅस्ट्रो (Fidel Castro) यांनी हुकूमशहा जनरल फुलजेन्सियो बॅटिस्टा यांच्या सैन्याचा पराभव केला आणि 16 फेब्रुवारी 1959 रोजी क्युबाची सत्ता हाती घेतली. त्यानंतर त्यांनी क्युबाचे पंतप्रधानपद स्वत:कडे घेतलं. 1965 मध्ये ते क्युबाच्या कम्युनिस्ट पक्षाचे पहिले सचिव बनले आणि क्युबाला एक-पक्षीय समाजवादी प्रजासत्ताक बनवलं. फिडेल कॅस्ट्रो यांनी 2 डिसेंबर 1976 रोजी क्युबाच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली. त्यानंतर 1976 ते 2008 सालापर्यंत त्यांनी क्युबा अध्यक्षपद सांभाळलं. 


साम्यवादी मार्क्सवादी-लेनिनवादी विचारसरणीच्या आधारे फिडेल कॅस्ट्रो याने क्युबात क्रांती केली. त्याने स्थापन केलेल्या  ‘26 जुलै मूव्हमेंट’ या संघटनेला तरुणांचा मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळाला आणि क्युबात त्याच्या नेतृत्वाखाली नव्या साम्यवादी विचारसरणीचे सरकार स्थापन झाले. त्यानंतर त्यानं तब्बल 47 वर्षे त्याने क्युबावर निर्विवादीत वर्चस्व गाजवले. त्याच्या काळात साम्यवादावर नियंत्रण ठेवण्यासाठी अमेरिकेने अनेक पाऊले उचलली. अमेरिकेने जवळपास 45 वर्षांहून जास्त काळ क्युबावर आर्थिक निर्बंध लादले. तरीही फिडेल कॅस्ट्रो डगमगला नाही. अमेरिकेची गुप्तहेर संघटना असलेल्या सीआयएने फिडेल कॅस्ट्रोला अनेकदा ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचं सांगितलं जातंय. पण कॅस्ट्रो या सर्वांना पुरून उरला


1969 : मिर्झा गालिब यांच्या पुण्यातिथीनिमित्त पोस्टल स्टॅम्प जारी 


प्रसिद्ध उर्दू कवी मिर्झा गालिब (Mirza Ghalib) यांच्या 100 व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या सन्मानार्थ 16 फेब्रुवारी 1969 रोजी पोस्टल स्टॅम्प जारी करण्यात आलं.  मिर्झा गालिब यांचे 15 फेब्रुवारी 1869 रोजी निधन झाले. दिल्लीतील हजरत निजामुद्दीन भागात हजरत निजामुद्दीन औलिया यांच्या दर्ग्याजवळ त्यांची समाधी बांधलेली आहे. त्यांच्या शायरीतून ते आजही सर्वांच्या हृदयात जिवंत आहे.


1998 : चीनचं विमान तैपई येथे कोसळलं, 204 लोकांचा मृत्यू


इंडोनेशियातील बालीहून निघालेले चायना एअरलाइन्सचे विमान तैवान, तैपेई येथे उतरत असताना कोसळले. विमानातील सर्व 197 लोकांव्यतिरिक्त, जमिनीवर असलेल्या 7 लोकांनाही या अपघातात आपला जीव गमवावा लागला.


2005 : क्योटो करार लागू


जागतिक तापमानवाढीमुळे होणारे हवामान बदल रोखण्यासाठी क्योटो कराराची (Kyoto Protocol) निर्मिती करण्यात आली. हरितगृह वायू उत्सर्जन कमी करण्यासाठी जागतिक स्तरावर प्रयत्न करण्याची गरज भासू लागली आणि क्योटो कराराची निर्मिती झाली. त्यातील पहिला भाग म्हणजे ग्लोबल वार्मिंग आणि दुसरा भाग म्हणजे मानवनिर्मित CO2 उत्सर्जनामुळे होणारी तापमानवाढ असा होता. क्योटो करार 11 डिसेंबर 1997 रोजी क्योटो, जपानमध्ये स्वीकारण्यात आला आणि 16 फेब्रुवारी 2005 रोजी अंमलात आला. सध्या या प्रोटोकॉलमध्ये 192 पक्ष आहेत. डिसेंबर 2011 मध्ये कॅनडाने प्रोटोकॉलमधून माघार घेतली.


2013- पाकिस्तानमध्ये बॉम्बस्फोट, 190 लोकांचा मृत्यू 


आजच्याच दिवशी म्हणजे 16 फेब्रुवारी 2013 रोजी पाकिस्तानातील हजारा भागातील एका मार्केटमध्ये एक मोठा बॉम्बस्फोट झाला. या बॉम्बस्फोटात 190 लोकांचा मृत्यू झाला.


इतर महत्वाच्या बातम्या 


कोकणात ठाकरेंना मोठा धक्का बसणार? वैभव नाईक आणि रवींद्र चव्हाण यांच्या भेटीनंतर चर्चेला उधाण!