माजी अर्थमंत्री जेटली हे 1999 ते 2012 पर्यंत दिल्ली क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष होते. त्या काळात दिल्ली क्रिकेट असोसिएशनमधल्या पायाभूत सुविधांमध्ये अमूलाग्र बदल घडवून आणण्यात जेटली यांचा मोठा वाटा होता. म्हणूनच जेटलींच्या स्मरणार्थ कोटला स्टेडियमचं नामकरण करण्याचा निर्णय डीडीसीएनं घेतला आहे.
माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांचं शनिवार 25 ऑगस्ट रोजी दिल्लीतील एम्स रुग्णालयात दिर्घ आजाराने निधन झाले. जेटली यांचं दिल्ली क्रिकेटसाठी केलेलं काम महत्त्वाचं आहे. त्यामुळेच राजकीय क्षेत्रासह क्रिडा क्षेत्रातील योगदानाबद्दल दिल्ली जिल्हा क्रिकेट असोसिएशनकडून त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. तसेच स्टेडियममधील एका स्टँडला भारतीय कर्णधार विराट कोहलीचं नाव देण्यात येण्यात येणार आहे.
New Delhi | दिल्लीच्या फिरोज शाह कोटला स्टेडियमला अरुण जेटलींचं नाव | नवी दिल्ली | ABP Majha
अरुण जेटली आणि क्रिकेटचं नातं
भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांचं आज 66 व्या वर्षी निधन झालं. अरुण जेटली यांचं राजकारणाव्यतिरिक्त क्रिकेटवर खास प्रेम होतं. त्यांचे अनेक क्रिकेटर्ससोबत चांगले संबध होते.
अरुण जेटली यांनी वीरेंद्र सेहवागपासून सध्याचा भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीसह अनेकांना मदत केली. शिखर धवन, इशांत शर्मा, गौतम गंभीर यांसारख्या यशस्वी क्रिकेटर्सची करिअर घडवण्यात अरुण जेटलींचं मोठं योगदान होतं, असं बोललं जातं.
अरुण जेटली डीडीसीएचे अध्यक्ष आणि बीसीसीआयचे उपाध्यक्षही होते. ते क्रिकेटर्सना नेहमीच प्रोत्साहत देत असत. चांगले खेळाडू भारतीय संघात समाविष्ट व्हावे, यासाठी जे खेळाडू चांगलं प्रदर्शन करत असे, त्यांच्यासाठी ते स्वत:हून बीबीसीआयशी बोलत असत, असंही बोललं जातं. यातून त्यांची क्रिकेटविषयची आपुलकी दिसते.