एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पोलिसांपासून वाचण्यासाठी प्लास्टिक सर्जरी, कारचोराला अटक
पोलिसांपासून वाचण्यासाठी प्लास्टिक सर्जरी करुन चेहरे बदलणाऱ्या कुणाल या चोराला दिल्ली पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत
नवी दिल्ली : 20 वर्ष... चोरीच्या एक हजारापेक्षा जास्त घटना आणि एकच चोर... पोलिसांपासून वाचण्यासाठी प्लास्टिक सर्जरी. इतके सारे उपद्व्याप करणाऱ्या 'सुपरचोरा'ला अखेर बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. देशाची राजधानी दिल्लीमधील या घटना आहेत.
पोलिसांपासून वाचण्यासाठी प्लास्टिक सर्जरी करुन चेहरे बदलणाऱ्या कुणाल या चोराला दिल्ली पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. एकाच वेळी अनेक गर्लफ्रेंड्सचे लाड पुरवण्यासाठी तो चोऱ्या करायला लागला. 1997 मध्ये म्हणजे वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षी त्याने चोरी करायला सुरुवात केली.
गेल्या 20 वर्षात त्याच्या चोऱ्यांचा ग्राफ वाढला, तसा त्याच्या गर्लफ्रेण्ड्सचाही. दिल्ली एनसीआर भागात हजारापेक्षा जास्त गाड्या त्याने पळवल्या आहेत. फेब्रुवारी 2017 मध्ये तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर सात महिन्यांतच त्याने दिल्लीतून शंभरपेक्षा जास्त कार चोरल्या आहेत.
कुणालला बऱ्याच वेळा पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांच्या जाळ्यातून सुटण्यासाठी त्यानं आत्महत्येचा प्रयत्न करण्याचाही बनाव केला. एकदा तर तो पोलिस कोठडीतून पळण्यात यशस्वीही झाला होता. अखेर कुणालसह दोन साथीदारांना जेरबंद करण्यात पोलिस यशस्वी झाले आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
करमणूक
निवडणूक
भारत
Advertisement