एक्स्प्लोर

भाजपचा कौतुकास्पद निर्णय, विद्यमान नगरसेवकांना तिकीट नाही

नवी दिल्ली: पक्षाच्या कामासाठी कार्यकर्त्यांची तर गरज असते, पण निवडणुकीत तिकीट वाटपाची वेळ आली की अनेक पक्षांना तेच तेच नेते, चेहरे आठवतात. हे चित्र बदलणारी, देशाच्या राजकीय व्यवस्थेतली एक अत्यंत सकारात्मक अशी घडामोड दिल्लीत पाहायला मिळतेय. दिल्लीत लवकरच 3 महानगरपालिकांच्या निवडणुका होत आहेत, यात कुठल्याच विद्यमान नगरसेवकाला पुन्हा तिकीट न देण्याचा निर्णय भाजपनं घेतला आहे. असंच चित्र आपल्याकडच्या निवडणुकांमध्ये पाहायला मिळावं हीच अपेक्षा आहे. उत्तर प्रदेशातल्या ऐतिहासिक विजयानंतर आत्मविश्वास वाढलेल्या भाजपनं दिल्लीत एका नव्या प्रयोगाची चाहूल दिली आहे. दिल्ली महापालिकेच्या निवडणुकीत कुठल्याच विद्यमान नगरसेवकाला पुन्हा तिकीट मिळणार नाही. एप्रिल महिन्यात दिल्लीतल्या 3 महानगरपालिकेच्या निवडणुका होतायत. त्याची रणनीती ठरवण्यासाठी पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या नेतृत्वात कोअर कमिटीची बैठक झाली, त्यात हा निर्णय घेण्यात आला. दिल्लीतल्या उत्तर, दक्षिण आणि पूर्व या तीनही महापालिकांवर सध्या भाजपची सत्ता आहे. एकूण 272 नगरसेवकांपैकी 153 नगरसेवक भाजपचे आहेत. या निवडणुकीत यावेळी आम आदमी पक्ष, काँग्रेसचंही आव्हान आहे. त्याला तोंड देण्यासाठी भाजपनं सगळे नवे चेहरे मैदानात उतरवण्याचं ठरवलंय. या कठोर निर्णयानं काही नगरसेवकांवर रडकुंडीची वेळ आलीय. पण तरीही पक्षासाठी आपण त्याग करायला तयार आहोत असं ते म्हणतायत. नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते, तेव्हा अमित शहांनीच पक्षात अशा पद्धतीचा फॉर्म्युला राबवलेला आहे. हा यशस्वी झालेला गुजरात फॉर्म्युला आता ते दिल्लीतही आणत आहेत. दिल्ली महापालिकेतल्या अनेक मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानं हा बदल भाजपच्या पथ्यावरच पडेल अशी शक्यता आहे. आपल्या महाराष्ट्रात नुकत्याच पालिका, महापालिकेच्या निवडणुका झाल्या. त्यावेळी सगळी तिकीटं कशी त्याच त्याच नगरसेवकांच्या घरात, त्यांच्याच नातेवाईकांना मिळाली हे आपण पाहिलेलं आहे. भाजपनं दिल्लीतला हा धाडसी निर्णय आता इतर राज्यांतही राबवावा. ज्यामुळे किमान स्थानिक राजकारणात वेगवेगळ्या कार्यकर्त्यांना संधी मिळत राहील. या चांगल्या उपक्रमाचं अनुकरण आपल्याकडे नेते कधी करणार हा प्रश्न आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

West Bengal: निवडणूक जाहीर होताच पहिला ओपिनियन पोल आला; पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता? भाजप-तृणमूलमध्येच जोरदार टक्कर
पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता? तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार लढत, पहिला ओपिनियन पोल समोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 मार्च 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 मार्च 2026 | रविवार
West Bengal Election in 2 phases: केरळ, तमिळनाडू एकाच टप्प्यात अन् पश्चिम बंगालमध्ये दोन टप्प्यात मतदान; सीएम ममता अन् केरळात डाव्यांसमोर गड राखण्याचे आव्हान
केरळ, तमिळनाडू एकाच टप्प्यात अन् पश्चिम बंगालमध्ये दोन टप्प्यात मतदान; सीएम ममता अन् केरळात डाव्यांसमोर गड राखण्याचे आव्हान
मोठी बातमी! प.बंगालसह 5 राज्यातील विधानसभा निवडणुकांची तारीख जाहीर; दोन टप्प्यात मतदान, 4 मे रोजी निकाल
मोठी बातमी! प.बंगालसह 5 राज्यातील विधानसभा निवडणुकांची तारीख जाहीर; दोन टप्प्यात मतदान, 4 मे रोजी निकाल

व्हिडीओ

Baramati Rahuri Election : बारामती, राहुरीची पोटनिवडणूक 23 एप्रिलला, निवडणूक आयोगाची माहिती
North Korea Ballistic missile: एकीकडे इराण Vs अमेरिका युद्ध शिगेला, दुसरीकडे किम जोंग उन मैदानात, उत्तर कोरियाने 10 बॅलेस्टिक मिसाईल सोडल्या
Kishori Pednekar on Ritu Tawde : मुंबईच्या महापौर पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठ्या झाल्या का? पेडणेकर आक्रमक
kharg Island Special Report : इराणच्या मुकूटमणीवर अमेरिकेचा शक्तिशाली बॉम्बहल्ला
Election Comission PC : 5 राज्यांच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार? निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
West Bengal: निवडणूक जाहीर होताच पहिला ओपिनियन पोल आला; पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता? भाजप-तृणमूलमध्येच जोरदार टक्कर
पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता? तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार लढत, पहिला ओपिनियन पोल समोर
महापौर रितू तावडेंच्या कारवरील लाल-निळे दिवे हटले; विरोधकांच्या टीकेनंतर अधिकाऱ्यांना जाग
महापौर रितू तावडेंच्या कारवरील लाल-निळे दिवे हटले; विरोधकांच्या टीकेनंतर अधिकाऱ्यांना जाग
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 मार्च 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 मार्च 2026 | रविवार
SA vs NZ :  दक्षिण आफ्रिकेनं टी 20 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीतील पराभवाचा वचपा काढला, न्यूझीलंडवर 7 विकेटनं दणदणीत विजय
दक्षिण आफ्रिकेनं टी 20 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीतील पराभवाचा वचपा काढला, न्यूझीलंडवर 7 विकेटनं दणदणीत विजय
बीड महिला अत्याचारप्रकरणाची मुंबईतून दखल; पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावरही गुन्हा दाखल करण्याचे निर्देश
बीड महिला अत्याचारप्रकरणाची मुंबईतून दखल; पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावरही गुन्हा दाखल करण्याचे निर्देश
West Bengal Election in 2 phases: केरळ, तमिळनाडू एकाच टप्प्यात अन् पश्चिम बंगालमध्ये दोन टप्प्यात मतदान; सीएम ममता अन् केरळात डाव्यांसमोर गड राखण्याचे आव्हान
केरळ, तमिळनाडू एकाच टप्प्यात अन् पश्चिम बंगालमध्ये दोन टप्प्यात मतदान; सीएम ममता अन् केरळात डाव्यांसमोर गड राखण्याचे आव्हान
Baramati and Rahuri By Election : बारामती आणि राहुरीची पोटनिवडणूक जाहीर, 23 एप्रिलला मतदान, मतमोजणी 'या' दिवशी, निवडणुकीचं संपूर्ण वेळापत्रक, जाणून घ्या
बारामती आणि राहुरीची पोटनिवडणूक जाहीर, 23 एप्रिलला मतदान, मतमोजणी 'या' दिवशी, निवडणुकीचं संपूर्ण वेळापत्रक
West Bengal Election: निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेतील अवघा दीड बाकी असतानाच सीएम ममता बॅनर्जींचा मास्टरस्ट्रोक!
निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेतील अवघा दीड बाकी असतानाच सीएम ममता बॅनर्जींचा मास्टरस्ट्रोक!
Embed widget