Maha Vikas Aghadi : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीमध्ये (Maha Vikas Aghadi) चांगलाच समन्वयाचा अभाव दिसतोय... विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Vidhansabha Election) झालेला पराभव पाहता महाविकास आघाडीतील (Maha Vikas Aghadi) नेते आता जाहीरपणे एकमेकांच्या झालेल्या चुकांची मांडणी करत एकमेकांवर चिखल फेक करताना दिसत आहेत... विधानसभा निकालानंतर एकही बैठक राज्यस्तरावर महाविकास आघाडीची झाली नाही. त्यामुळेच महाविकास आघाडीमध्ये नेमकी काय बिघाडी झाली आहे? पाहूया या रिपोर्टमधून
विधानसभा निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबर रोजी जाहीर झाला... ज्यामध्ये महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला... या पराभवानंतर महाविकास आघाडी एकत्रित मोठ्या मंचावर दिसली नाही की मग त्यांच्या राज्यस्तरीय बैठका सुद्धा झाल्या नाही... त्यामुळे खरंच महाविकास आघाडी एकत्रित आहे का? असा प्रश्न सध्या उपस्थित होतोय... महाविकास आघाडीत झालेला पराभवाला कसे पक्ष आणि नेते जबाबदार आहेत, याच जाहीर विश्लेषण बड्या नेत्यांकडून आता केलं जातंय...
महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा मुद्दा असू द्यात किंवा मग मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करण्याचा विषय असू द्या... विधानसभेवेळी बैठकांमध्ये कधीच एकमत झालं नाही... आणि त्यामुळेच महाविकास आघाडीमध्ये समन्वयाचा अभाव झाल्याचं महाविकास आघाडीतील नेत्यांनीच मान्य केलं...मागील दीड महिन्यात महाविकास आघाडीची एकही बैठक राज्यस्तरावर झाली नाही... प्रत्येक पक्ष आपलं वैयक्तिक चिंतन आणि बैठका घेत आहे.... त्यात ठाकरेंची शिवसेना आगामी महापालिका निवडणुकांमध्ये स्वबळाचा नारा देत आहे... त्यामुळे महाविकास आघाडीची एकजूट आणि समन्वय निकालानंतर कुठे दिसत नसल्याचं सुरू असलेल्या घडामोडींवर दिसत आहे... ज्यांनी महाविकास आघाडीची मूठ बांधली ... वज्रमुठ घट्ट केली ... ते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सुद्धा नाराज असल्याची माहिती आहे.
एकमेकांच्या चुका आता जाहीरपणे बोलून दाखवणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये आणि एकूणच आघाडीमध्ये समन्वय नसल्याने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी महाविकासाकडे एकत्र असणार ? की मग प्रत्येक पक्ष स्वबळाचा नारा देऊन महाविकास आघाडी संपुष्टात येणार... आता सांग ना जरी कठीण असलं... तरी महाविकास आघाडी जर एकत्र ठेवायची असेल तर प्रमुख नेत्यांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे... अन्यथा एकला चलो रे च्या नाऱ्यावर सर्वच पक्ष आगामी निवडणुका लढतील असं दिसतंय.
इतर महत्त्वाच्या बातम्या