Delhi: दिल्लीच्या अँटी करप्शन ब्युरोनं (ACB) शुक्रवारी आम आदमी पक्षाचे (AAP) आमदार अमानतुल्ला खान (Amanatullah Khan) यांना अटक केलीय. दिल्ली वक्फमधील कथित बेकायदेशीर नियुक्तीशी संबंधित दोन वर्ष जुन्या भ्रष्टाचार प्रकरणी एसीबीनं ही कारवाई केलीय. याआधी एसीबीनं त्यांच्या निवासस्थानासह पाच ठिकाणी छापे टाकले. छापेमारीत 24 लाख तसेच दोन बेकायदेशीर आणि विना परवाना शस्त्रे जप्त करण्यात आलीय. अमानतुल्ला खान यांच्या अटकेनंतर आप पक्षानं त्यांच्या पाठीशी उभे राहून त्यांच्यावरील आरोपांना निराधार म्हटलंय.
"अमानतुल्ला खान यांची अटक निराधार आहे. त्यांच्या घरावर आणि कार्यालयावर छापे टाकून काहीही सापडले नाही.'आप'ला बदनाम करण्याचा आणि आमदारांची प्रतिमा मलिन करण्याचा हा नवा प्रयत्न आहे", असं आपकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
नेमकं प्रकरण काय?
दिल्ली वक्फमधील कथित बेकायदेशीर नियुक्तीशी संबंधित अमानतुल्ला खान यांनी भ्रष्टाचार केल्याच त्यांच्यावर आरोप करण्यात आला होता. अमानतुल्ला खान यांनी 2020 मध्ये दिल्ली वक्फ बोर्डाचे अध्यक्ष म्हणून काम करताना सर्व नियमांचे आणि सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करत 32 व्यक्तींची बेकायदेशीरपणे भरती केली. दिल्ली वक्फ बोर्डाच्या तत्कालीन सीईओकडून हा आरोप करण्यात आलाय. त्यानंतर एसीबीकडून ही कारवाई करण्यात आली.
अमानतुल्ला खान यांच्या अटकेनंतर मनीष सिसोदियांचं ट्वीट
अमानतुल्ला खान यांच्या अटकेनंतर मनीष सिसोदियांचं ट्वीट केलं. ज्यात त्यांनी असं म्हटलंय की, “प्रथम त्यांनी सत्येंद्र जैन यांना अटक केली, परंतु त्यांच्याविरुद्ध न्यायालयात कोणतंही पुरावे सादर करता आले नाहीत. त्यांनी माझ्या घरावर छापा टाकला. तिथे काही मिळालं नाही. त्यानंतर कैलाश गेहलोत यांच्याविरुद्ध खोटा तपास सुरू झाला आणि आता अमानतुल्ला खानला अटक करण्यात आली आहे. 'आप'च्या प्रत्येक नेत्याला फोडण्यासाठी ऑपरेशन लोटस सुरू आहे."
एसीबीच्या कारवाईत अमानतुल्ला खान यांच्या नातेवाईकांकडून अथडळा
अमानतुल्ला खान यांच्या घराबाहेर एसीपी टीमवर हल्ला झाल्याचंही पोलिसांनी सांगितलं आहे. खान यांच्या नातेवाईकांनी व इतरांनी पोलिस दलाला घेराव घातला. ज्यामुळं सरकारी कामात अडथळा निर्माण झाला.अमानतुल्ला खान यांच्या नातेवाईकांनी पोलिस पथकावर केलेल्या हल्ल्याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
हे देखील वाचा-