PM Narendra Modi Birthday : आज (17 सप्टेंबर) देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा 72 वा वाढदिवस आहे. यानिमित्त देशातील विविध राज्यात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे. आजचा दिवस पंतप्रधानांसाठी खूप व्यस्त असणार आहे. आज पंतप्रधान वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत. ते आज मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. तेथील कुनो नॅशनल पार्कमध्ये नामिबियातून भारतात आणलेले 8 चित्ते सोडण्यात येणार आहेत. त्या कार्यक्रमाला पंतप्रधान उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदी यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. विविध स्तरातून त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत.
महाराष्ट्रातही 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा’ (Seva Pandharvada) आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi Birthday) यांचा वाढदिवस ते राष्ट्रपिता महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांची जयंती. या पंधरवड्यामध्ये नागरिकांचे प्रलंबित अर्ज निकाली काढण्यासाठी संपूर्ण प्रयत्न करण्याचे निर्देश दिले. या पंधरवड्याच्या अंमलबजावणीचा मंत्रिमंडळ बैठकीत आढावा घेण्यात येणार आहे.
राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
विविध राजकीय नेत्यांकडून पंतप्रधानांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. यामध्ये भाजपच्या नेत्यांसोबतच विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी देखील पंतप्रधानांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. राहुल गांधी यांनी ट्वीट करत मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत.
तुमच्या नेतृत्वाने देश मजबूत झाला : राजनाथ सिंह
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वामुळे देशाची प्रगती झाली. तसेच सुशासनाला अभूतपूर्व बळ मिळालं आहे. त्यांच्या नेतृत्वात देश मजबूत झाल्याचे सिंह यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलंआहे.
देशवासीयांच्या जीवनातील अंधार दूर करण्याचे काम करा : काँग्रेस नेते शशी थरुर
काँग्रेसचे नेते शशी थरुर यांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी ट्वीट करत शुभेच्छा दिल्या आहेत. देशवासीयांच्या जीवनातील सर्व अंधार दूर करण्यासाठी तुम्ही काम करा, असे शशी थरुर यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
तुमच्या नेतृत्वाखाली देशातील भ्रष्टाचार संपला पाहिजे : नितीन गडकरी
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील ट्वीट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवसाच्या शुभच्छा दिल्या आहेत. तुमच्या नेतृत्वात देशातील भीती, भूक आणि भ्रष्टाचार पूर्णपणे नष्ट झाला पाहिजे असे गडकरींनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनीही दिल्या शुभेच्छा
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनीही पंतप्रधान मोदींचे अभिनंदन केले आहे. पंतप्रधान मोदींनी आपले जीवन लोकांच्या कल्याणासाठी समर्पित केले आहे. त्यांच्या नेतृत्वात देशाची प्रगती होत असल्याचे चौहान यांनी म्हटलं आहे.
तुमचे विचार भारतीयांसाठी प्रेरणादायी : स्मृती इराणी
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी ट्विट करून पंतप्रधान मोदींचे अभिनंदन केले आहे. देशहिताचे तुमचे विचार आणि कर्मयोगींच्या रूपातील तुमचे अप्रतिम व्यक्तिमत्व आम्हा करोडो भारतीयांसाठी प्रेरणास्थान असल्याचे इराणी यांनी म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या: