मुंबई :  पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi Birthday) यांचा 17 सप्टेंबर 1950 रोजी जन्म झाला. त्यांना 26 मे 2014 रोजी भारताचे तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी देशाचे 15 वे पंतप्रधान म्हणून शपथ दिली होती. पाच वर्षांनंतर म्हणजे 2019 मध्ये भारतीय जनता पक्षाने नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा निवडणूक जिंकली आणि पंतप्रधान म्हणून त्यांचा दुसरा कार्यकाळ सुरू झाला. नरेंद्र मोदी हे देशाचे पहिले पंतप्रधान आहेत ज्यांचा जन्म स्वतंत्र भारतात झाला. या शिवाय आज मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन (Marathwada Liberation Day) आहे. आजच्या दिवशी म्हणजे 17 सप्टेंबर 1948 रोजी मराठवाडा रझाकारांच्या जोखडातून मुक्त झाला. 


 1867 :  गगेंद्रनाथ टागोर यांचा जन्म 
 
गगेंद्रनाथ टागोर यांचा जन्म 17 सप्टेंबर 1867 रोजी कोलकाता येथील जोरसांको येथील ठाकूर कुटुंबात झाला. ते रवींद्र नाथ टागोरांचे पुतणे होते.  त्यांच्या वडिलांचे नाव गुणेंद्रनाथ टागोर तर त्यांच्या आईचे नाव 'सुहासिनी देवी' होते. गगनेंद्रनाथ 14 वर्षांचे होते तेव्हा त्यांचे वडील वारले, त्यानंतर त्यांच्या आईने त्याची काळजी घेतली.  या घराण्याच्या सर्जनशीलतेने संपूर्ण बंगालच्या संस्कृतीला एक नवा आकार दिला.  


  1948 : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन 
15 ऑगस्ट  1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. पण त्यावेळी संपूर्ण देश विविध संस्थानांमध्ये विखुरलेला होता. त्यावेळच्या 565 पैकी 562 संस्थांनांनी स्वतंत्र भारतात सामील होण्याची सहमती दर्शविली. मात्र हैदराबाद संस्थान, जम्मू आणि काश्मीर व जुनागड संस्थान ही तीन संस्थाने स्वतंत्र भारतात सामील झाली नव्हती. हैदराबाद संस्थानावर निजाम मीर उस्मान अली खान यांचे राज्य होते. हैदराबाद संस्थानावर तब्बल सहा पिढ्यांपासून निझाम वंशाचे राज्य होते. त्यांच्या निजामांच्या राज्यातून मुक्त होऊन भारतीय संघराज्यात सामील होण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण हैदराबाद संस्थानात मुक्ती संग्राम सुरू झाला होता. शेवटी 17 सप्टेंबर 1948 रोजी हैदराबाद रझाकारांच्या जोखडातून मुक्त झाला. यालाच महाराष्ट्रात मराठवाडा मुक्तिसंग्राम म्हटले जाते.  
 
1949  : दक्षिण भारतातील राजकीय पक्ष द्रविड मुनेत्र कळघम (DMK) ची स्थापना


द्रविड मुन्नेत्र कळघम अर्थात DMK हा तामिळनाडूमधील एक प्रमुख राजकीय पक्ष आहे. पेरियार यांच्या जस्टिस पार्टी आणि द्रविड कळघम यांच्यातील मतभेदांमुळे त्याची स्थापना झाली.  17 सप्टेंबर 1949 रोजी त्याच्या स्थापनेची घोषणा करण्यात आली.  


1950 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस 


17 सप्टेंबर 1950 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्म झाला. त्यांना 26 मे 2014 रोजी भारताचे तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी देशाचे 15 वे पंतप्रधान म्हणून शपथ दिली होती. पाच वर्षांनंतर म्हणजे 2019 मध्ये भारतीय जनता पक्षाने नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा निवडणूक जिंकली आणि पंतप्रधान म्हणून त्यांचा दुसरा कार्यकाळ सुरू झाला. नरेंद्र मोदी हे देशाचे पहिले पंतप्रधान आहेत ज्यांचा जन्म स्वतंत्र भारतात झाला.


1956 : इंडियन ऑइल आणि नॅचरल गॅस कमिशनची स्थापना 


ऑइल ॲंड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड  ही भारत देशामधील एक सरकारी कंपनी आहे. ही ओ.एन.जी.सी. खनिज तेल व वायूचा शोध घेणारी भारतामधील सर्वात मोठी कंपनी आहे. भारताला लागणारे 69 टक्के खनिज तेल आणि 62 टक्के नैसर्गिक वायू ओ.एन.जी.सी. पुरवते.
 
 1957 : मलेशिया संयुक्त राष्ट्र संघात सहभागी झाला


मलेशिया हा दक्षिणपूर्व आशियामधील एक उष्णकटिबंधीय देश आहे. दक्षिण चीन समुद्राने त्याचे दोन भाग केले आहेत. मलय द्वीपकल्पावर स्थित, मुख्य भूभाग त्याच्या पश्चिम किनार्‍यावर मलाक्काच्या सामुद्रधुनीने आणि पूर्व किनार्‍यावर दक्षिण चीन समुद्राने वेढलेला आहे. देशाचा दुसरा भाग पूर्व मलेशिया म्हणून ओळखला जातो, दक्षिण चीन समुद्रातील बोर्नियो बेटाच्या उत्तरेकडील भागात स्थित आहे. मलय द्वीपकल्पावर स्थित क्वालालंपूर ही देशाची राजधानी आहे, परंतु फेडरल राजधानी अलीकडेच विशेषत: प्रशासनासाठी बांधलेल्या पुत्रजया या नवीन शहरात हलविण्यात आली आहे. हे 13 राज्यांचे बनलेले एक संघराज्य आहे. 1957 मध्ये मलेशिया संयुक्त राष्ट्र संघात सहभागी झाला. 


1974 : बांगलादेश, ग्रेनेडा आणि गिनी बिसाऊ संयुक्त राष्ट्रात सहभागी झाले 


बांगलादेश, ग्रेनेडा आणि गिनी बिसाऊ आजच्या दिवशी म्हणजे 17 सप्टेंबर 1974 रोजी संयुक्त राष्ट्रात सहभागी झाले.