22nd January In History : मराठवाडा मुक्तीसंग्रामाचे नेते स्वामी रामानंद तिर्थ याचे आजच्याच दिवशी निधन झालं होतं. तसेच आजचा दिवस हा देशातील एका घटनेने हादरला होता. ओडिशातील मनोहरपूर गावात जमावाने ऑस्ट्रेलियन मिशनरी स्टेन्स आणि त्यांच्या दोन मुलांची पेट्रोल टाकून पेटवून हत्या केली. स्टेन्स यांनी जवळजवळ 30 वर्षे कुष्ठरोगी रुग्णांसाठी काम केलं. परंतु अनेकांचं धर्मांतर केल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला होता. यातूनच त्यांची हत्या करण्यात आली. 


1666 :  मुघल सम्राट शाहजहान यांचे निधन ( Mughal Emperor Shah Jahan)


आजच्या दिवशी म्हणजे 22 जानेवारी 1666 रोजी ताजमहालच्या रूपाने जगाला प्रेमाची महान देणगी देणारा मुघल सम्राट शाहजहान यांचे निधन झाले. जगातील सात आश्चर्यांपैकी एक असलेल्या ताजमहालच्या बांधकामासाठी मुघल राजघराण्याचा पाचवा सम्राट शहाजहानची आठवण आजही लोकांना आहे. ताजमहाल हा शाहजहान आणि त्याची प्रिय बेगम मुमताज महल यांच्या प्रेमाचे प्रतीक आहे. मुघल सम्राट शाहजहान हा कला आणि वास्तुकलेचा निस्सीम प्रेमी होता. यातूनच त्यांनी ताजमल बांधला होता. 


1901  :  राणी व्हिक्टोरियाचा मृत्यू  (Queen Victoria)


राणी व्हिक्टोरिया यांचा 22 जानेवारी 1901 रोजी मृत्यू झाला. 1837 मध्ये ग्रेट ब्रिटन आणि आयर्लंडची राणी म्हणून राणी व्हिक्टोरिया सिंहासनावर बसल्या आणि  त्यानंतर मृत्यूपर्यंत त्या राणीपदी विराजमान होत्या. राणी व्हिक्टोरिया या 36 वर्षे आणि 216 दिवस इंग्लंडवर राज्य करणाऱ्या राणी होत्या. 


1972 :  मराठवाडा स्वातंत्र्यसंग्रामाचे प्रणेते स्वामी रामानंद तीर्थ यांचे निधन ( Swami Ramanand Tirtha)


भारतीय राजनीतिज्ञ आणि शिक्षणतज्ज्ञ स्वामी रामानंद तीर्थ यांचे 22 जानेवारी 1972 रोजी निधन झाले. स्वामी रामानंद हे स्वातंत्र्य लढ्यातील एक थोर नेते, शिक्षणतज्ज्ञ, विद्वान व ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व होते. तसेच त्यांना मराठवाडा मुक्तीसंग्रामात भाग घेतला आणि लढ्याला प्रेरणा दिली. त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव व्यंकटेश भगवान खेडगीकर होते. त्यांचा जन्म 3 ऑक्टोबर 1903 रोजी कर्नाटकातील सिंदगी येथे झाला. गिरणी कामगारांच्या लढ्यात ते सक्रिय सहभागी झाले. ना. म. जोशींनी स्वामीजींना कामगारविषयक विधेयकाची माहिती घेण्यासाठी ऐन हिवाळ्यात दिल्लीला पाठविले. नंतर त्यांनी अध्यात्माची कास धरली. आपल्या जन्मनावाचा त्याग करून भिक्षुकी अंगीकारली. त्यानंतर हिप्परगा (तालुका लोहारा, जिल्हा उस्मानाबाद) येथे लखनौस्थित स्वामी नारायण यांच्याकडून दीक्षा घेऊन ते स्वामी रामानंद तीर्थ झाले.  


1973 : नायजेरियात जॉर्डन एअरलाइन्सचे विमान कोसळले


नायजेरियात जॉर्डन एअरलाइन्सचे विमान कोसळले. या अपघातात जवळपास 200 जणांचा मृत्यू झाला होता. 


1973 : अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने गर्भपाताला कायदेशीर मान्यता दिली


अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने गर्भपाताला कायदेशीर मान्यता दिली. गर्भपाताला गुन्ह्याच्या श्रेणीतून बाहेर काढत न्यायालयाने हा महिलांच्या गोपनीयतेचा घटनात्मक अधिकार असल्याचे म्हटले होते.


1980 : सोव्हिएत युनियनने सरकारविरोधी अणुशास्त्रज्ञ आंद्रेई सखारोव्हला अटक केली


सोव्हिएत युनियनने सरकारविरोधी अणुशास्त्रज्ञ आंद्रेई सखारोव्हला अटक केली. नोबेल शांतता पुरस्काराने सन्मानित सखारोव्ह यांनी एका अमेरिकन टेलिव्हिजन वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अफगाणिस्तानातून सोव्हिएत सैन्य मागे घेण्याची मागणी केली होती.


1996 : पृथ्वीपासून सुमारे 3,50,000 प्रकाश-वर्षांच्या अंतरावर दोन नवीन ग्रह शोधले 


कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या वेधशाळेतील शास्त्रज्ञांनी पृथ्वीपासून सुमारे 3,50,000 प्रकाश-वर्षांच्या अंतरावर दोन नवीन ग्रह शोधले.


1999 : ऑस्ट्रेलियन मिशनरी ग्रॅहम स्टेन्स आणि त्यांच्या दोन मुलांना जमावाने जिवंत जाळले


22 जानेवारी 1999 रोजी ऑस्ट्रेलियन मिशनरी ग्रॅहम स्टेन्स आणि त्यांच्या दोन मुलांना ओडिशातील केओंजार येथे जमावाने जिवंत जाळले. या घटनेने संपूर्ण जगभर खळबळ उडाली होती. मनोहरपूर गावात जमावाने स्टेन्स आणि त्यांच्या दोन मुलांची पेट्रोल टाकून पेटवून दिली. स्टेन्स ते जवळजवळ 30 वर्षे कुष्ठरोगी रुग्णांसाठी काम करत होते. परंतु त्या भागात धर्मांतर केल्याचा आरोप त्यांच्यावर होता. यातूनच त्यांची हत्या करण्यात आली.


2009 : सार्वजनिक खासगी भागीदारीवर आधारित तीन बंदर प्रकल्पांना सरकारने मान्यता दिली 


आर्थिक उदारीकरण, खासगीकरण आणि जागतिकीकरणाच्या युगात विकासाचा वेग वाढवण्यासाठी आणि सार्वजनिक खासगी सहकार्याला चालना देण्यासाठी गेल्या दशकात आर्थिक पटलावर एक नवीन संकल्पना वेगाने उदयास आली आहे, ती म्हणजे सार्वजनिक खासगी भागीदारी. जिथे एकीकडे सार्वजनिक खासगी भागीदारी आणि दुसरीकडे सरकारी खासगी सहकार्याद्वारे विकासाला चालना दिली जाते. तिथे सार्वजनिक गुंतवणूक मॉडेल सामान्यतः समाजवादी प्रवृत्ती असलेल्या देशांमध्ये स्वीकारले जाते. याच पार्श्वभूमीवर सार्वजनिक खासगी भागीदारीवर आधारित तीन बंदर प्रकल्पांना 22 जानेवारी 2009 रोजी सरकारने मान्यता दिली.


ही बातमी वाचा: