मुंबई : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी स्टॅलिन सरकारवर (Stalin Government) गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी म्हटलं की, तामिळनाडू (Tamil Nadu) सरकारने 22 जानेवारी रोजी होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमांच्या थेट प्रक्षेपणावर बंदी घातली आहे. एका तमिळ वृत्तपत्राच्या वृत्ताचा हवाला देत त्यांनी रविवार 21 जून रोजी यासंदर्भात ट्वीट करत हे आरोप करण्यात आले आहेत. दरम्यान डीएमके कडून या आरोपांचे खंडन करण्यात आले आहे. तमिळनाडू सरकारचे मंत्री शेखर बाबू यांनी निर्मला सीतारामन यांच्या या आरोपांना उत्तर दिलं आहे. त्यामुळे तमिळनाडू सरकारकडून देखील त्यांची भूमिका स्पष्ट करण्यात आल्याचं पाहायला मिळालं आहे. 


'आयोजकांकडून धमकी'


निर्मला सीतारामन यांनी म्हटलं की, हिंदू धार्मिक आणि धर्मादाय एंडोमेंट्स विभाग (HR&CE) द्वारे व्यवस्थापित केलेल्या मंदिरांमध्ये श्री रामाच्या नावाने कोणत्याही प्रकारच्या पूजा, भजन, प्रसाद, अन्नदानाला परवानगी देण्यात आली नाही. खासगी मंदिरांमध्येही कार्यक्रम आयोजित करण्यास पोलीस परवानगी देत नाहीत. ते आयोजकांना पंडाल पाडण्याची धमकी देत ​​आहेत. तामिळनाडू सरकारने प्रशासित मंदिरांनी अयोध्येतील भव्य मंदिराच्या अभिषेकाच्या दिवशी रामाच्या पूजेवर बंदी घातली आहे.






तमिळनाडूचे मंत्री शेखर बाबू यांनी केलं आरोपांचं खंडन


या आरोपांना प्रत्युत्तर देताना तामिळनाडूचे मंत्री पीके शेखर बाबू म्हणाले की, असे कोणतेही निर्बंध लादलेले नाहीत किंवा प्रभू रामाची पूजा आयोजित करण्यावर कोणत्याही प्रकारची बंदी सरकारकडून घालण्यात आलेली नाही. अन्नदान आणि प्रसाद वाटपावर कोणतेही तमिळनाडू सरकारने घातलेले नाही. सालेममध्ये सुरू असलेल्या द्रमुक युवा विंगच्या परिषदेपासून लोकांचे लक्ष हटवण्यासाठी ही अफवा पसरवली जात असल्याचा दावा शेखर बाबू यांनी त्यांच्या सोशल मीडियाच्य पोस्टवरुन केला आहे. तसेच  वृत्तपत्रातील वृत्त पूर्णपणे बनावट आणि चुकीचं असल्याचं त्यांनी यावेळी म्हटलं आहे. 






हेही वाचा : 


Ram Mandir Opening : राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला येणाऱ्या पाहुण्यांना मिळणार 'हा' खास प्रसाद; पाहा यात काय-काय मिळणार