Ayodhya Ram Mandir Inauguration : ज्या क्षणाची अवघ्या देशाला प्रतीक्षा होती, तो क्षण अवघ्या काही तासावर येऊन ठेपलाय. सोमवारी 22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होणार आहे. सोहळ्यासाठी येणाऱ्या पाहुण्यासाठी अयोध्यानगरी सज्ज झाली आहे. प्राणप्रतिष्ठेआधी सुरू झालेल्या पूजाविधीचा आजचा 6 वा दिवस आहे. प्रभू श्रीरामाच्या स्वागतासाठी राममंदिर फुलांनी आणि विद्युत रोषणाईनं सजलंय.
राममंदिराची मूर्ती मंदिरातील गाभाऱ्यात विराजमान झाली असून प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी 7 हजार 140 निमंत्रक येणार आहेत. शिवाय 112 परदेशी पाहुणेही सहभागी होतील. रामनगरी अयोध्येत 150 चार्टर्ड विमान उतरणार आहेत. व्हीव्हीआयपी घडामोडींमुळे अयोध्यानगरीवर छावणीचं रुप आलं आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर अयोध्येतील रामाची मूर्ती कशी आहे, राम मंदिराची रचना कशी आहे, त्यासाठीचे दगड कुठून आणले आहेत, तसेच मंदिराच्या परिसरात कोणत्या सुविधा आहेत या संबंधित सर्व माहितीवर एक नजर टाकूयात,
अशी आहे रामाची मूर्ती
मूर्तीत पाच वर्षाच्या मुलाची बालसुलभ कोमलता
प्रभू श्रीरामाच्या हातात धनुष्यबाण
पाणी प्रतिरोधक असल्याने हजारो वर्ष टिकणार
दुधाचा, पंचामृताच्या अभिषेकानेही परिणाम नाही
मूर्तीची चमक वर्षानुवर्ष कमी होणार नाही
पायाच्या बोटापासून कपाळापर्यंत 51 इंच उंची
मूर्तीचं वजन जवळपास 200 किलो इतकं आहे
डोक्यावर मुकूट आणि आभामंडल आहे
प्रभू श्रीरामाचे हात गुडघ्यापर्यंत लांब आहेत.
भव्य कपाळ, तेजस्वी आणि मोठे डोळे
कमळाच्या फुलावर उभी असलेली मूर्ती
मूर्तीसोबत दगडापासून आकाराची चौकट
एका बाजूला गरूड, दुसऱ्या बाजूला हनुमान
ही मूर्ती एकाच दगडापासून कोरण्यात आली
प्रभू श्रीरामाची मूर्ती काळ्या रंगाची
-----------------------------
मूर्ती आणि अवतारांची कीर्ती
मूर्तीवर भगवान विष्णूचे दहा अवतार
मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंहाचा अवतार
मूर्तीवर वामन, परशुराम, राम,अवतार
कृष्ण, बुद्ध आणि कल्की यांचे अवतार
-------------------------
काय आहेत मंदिरात इतर सुविधा?
श्रीराम कुंड - यज्ञशाळा
कर्मक्षेत्र - धार्मिक विधीची जागा
हनुमानगढी - हनुमानाची मूर्ती
राम जन्मभूमी- संग्रहालय
कम्म कीर्ती - सत्संग भवन
गुरू वशिष्ठ पीठिका - अध्ययन केंद्र
भक्ती टिला - ध्यानधारणा शांतता क्षेत्र
तुलसी - रामलीला केंद्र, खुलं सभागृह
राम दरबार - व्याख्यान, संवाद केंद्र
कौशल्या वात्सल्य मंडप - प्रदर्शन केंद्र
रमांगण - चित्रपटगृह
रामायण - एसी ग्रंथालय, वाचनालय
महर्षी वाल्मिकी - दस्तावेज संशोधन केंद्र
रामाश्रयम - भक्त निवास
श्री दशरथ - गोशाला
लक्ष्मण वाटिका - संगीत कारंज
लव-कुश निकुंज - लहान मुलांसाठी परिसर
मर्यादा खंड - पाहुण्यांसाठी कॉटेज, अपार्टमेंट
भरत प्रसाद मंडप - प्रसादासाठी कॅफेटेरिया
माता सीता रसोई अन्नकेंद्र - भव्य स्वयंपाक घर
---------------------
असा आहे ऐतिहासिक मंदिराचा भूगोल
एकूण परिसर- 2.7 एकर
चटईक्षेत्र- 57,400 चौरस फूट
मंदिराची लांबी-360 फूट
मंदिराची रुंदी- 235 फूट
कळसासह उंची- 161 फूट
एकूण मजले- 3
प्रत्येक मजल्याची उंची- 20 फूट
तळमजल्यावर खांब- 160
पहिल्या मजल्यावर खांब- 132
दुसऱ्या मजल्यावर खांब- 74
एकूण घुमट- 5
एकूण महाद्वार- 12
एकूण दरवाजे- 44
------------------
सहा मंडप वाढवणार मंदिराची शोभा
शिखर मंडप
गर्भगृह मंडप
कुदु मंडप
नृत्य मंडप
रंग मंडप
कीर्तन मंडप
---------------
मंदिरासाठी कुठून आणले दगड?
राजस्थानमधून खास दगड
बंसी पहाडपूरचे दगड
4.75 लाख क्युबिक फूट दगड
--------------
मंदिराची थोडक्यात संपूर्ण माहिती
बजेट- 1800 कोटी
आतापर्यंत खर्च- 900 कोटी
नागर शैलीत मंदिर
श्रीरामाची बालरुप मूर्ती
पहिला मजला- श्रीरामाचा दरबार
सिंहद्वारापासून 32 पायऱ्या
पूर्वेकडून मंदिर प्रवेश
4 बाजूंना आयताकृती तटबंदी
तटबंदीच्या कोनांना सूर्यदेव मंदिर
कोनांना आई भगवती, गणपती मंदिर
भगवान शिव यांना समर्पित मंदिरे
उत्तरेला अन्नपूर्णेचे मंदिर
दक्षिणेला हनुमानाचं मंदिर
मंदिराजवळ पौराणिक सीताकूप
दक्षिण-पश्चिम भागात जटायूची मूर्ती
लोखंडाचा वापर नाही
जमिनीवर काँक्रीटीकरणही नाही
14 मीटर जाडीचं कॉम्पॅक्टेड काँक्रीट
आरसीसीला कृत्रिम खडकाचे स्वरूप
ग्रॅनाईटचा 21 फूट उंच मंडप
अग्निशमनासाठी पाण्याची व्यवस्था
स्वतंत्र पॉवर स्टेशन
25 हजार क्षमतेचे यात्रेकरू केंद्र
स्वदेशी तंत्रज्ञानाने बांधणी
पर्यावरण-जलसंवर्धनाची काळजी
70 टक्के क्षेत्रावर हिरवळ
---------------------
मंदिरात भक्तांसाठी सुसज्ज यंत्रणा
बहुपयोगी वितरण कक्ष
बँकेसह एटीएमची सोय
स्वच्छतागृहांची सुविधा
अत्यावश्यक वैद्यकीय सुविधा
दिव्यांग, वृद्धांसाठी रॅम्प, लिफ्ट
सोलर, जनरेटरची यंत्रणा
भक्त सुविधा केंद्र
प्रशासकीय कार्यालय
भक्तांसाठी व्यवस्थापन यंत्रणा
--------------------
संपूर्ण मंदिर, समृद्ध दर्शन
खांब, भिंतींवर देवतांच्या मूर्ती
सिंहद्वारापासून 32 पायऱ्या
पूर्वेकडून मंदिर प्रवेश
दिव्यांग, वृद्धांसाठी रॅम्प, लिफ्ट
4 बाजूंना आयाताकृती तटबंदी
तटबंदीच्या कोनांना सूर्यदेव मंदिर
कोनांना आई भगवती, गणपती मंदिर
भगवान शिव यांना समर्पित मंदिरे
उत्तरेला अन्नपूर्णेचे मंदिर
दक्षिणेला हनुमानाचं मंदिर
मंदिराजवळ पौराणिक सीताकूप
दक्षिण-पश्चिम भागात जटायूची मूर्ती
लोखंडाचा वापर नाही
जमिनीवर काँक्रीटीकरणही नाही
14 मीटर जाडीचं कॉम्पॅक्टेड काँक्रीट
आरसीसीला कृत्रिम खडकाचे स्वरूप
ग्रॅनाईटचा २१ फूट उंच मंडप
अग्निशमनासाठी पाण्याची व्यवस्था
स्वतंत्र पॉवर स्टेशन
25 हजार क्षमतेचे यात्रेकरू केंद्र
स्वदेशी तंत्रज्ञानाने बांधणी
पर्यावरण-जलसंवर्धनाची काळजी
70 टक्के क्षेत्रावर हिरवळ
ही बातमी वाचा :