एक्स्प्लोर

31 डिसेंबर सरताना 'या' डेडलाईन पाळल्यात का?

जर तुम्ही जुनं मॅगस्ट्राईप डेबिट (एटीएम) किंवा क्रेडिट कार्ड वापरत असाल, तर तुम्हाला ते 1 जानेवारीपासून वापरता येणार नाही. 31 डिसेंबरनंतर जुन्या ऑपरेटिंग सिस्टीम असलेल्या नोकिया, अॅन्ड्रॉईड आणि अॅपल कंपनीच्या मोबाईल्समध्ये व्हॉट्सअॅप वापरता येणार नाही.

मुंबई : आपण सगळे नवीन वर्षाच्या उंबरठ्यावर आहोत. सरत्या वर्षाला टाटा-बाय बाय करताना नवीन वर्षात तुम्ही काही गोष्टींना मुकणार आहात. एक म्हणजे तुमचं चीप नसलेलं एटीएम किंवा क्रेडीट कार्ड तुम्हाला वापरता येणार नाही. त्याचप्रमाणे जुन्या फोनमध्ये व्हॉट्सअॅप वापरता येणार नाही. मॅगस्ट्राईप कार्ड जर तुम्ही जुनं मॅगस्ट्राईप डेबिट (एटीएम) किंवा क्रेडिट कार्ड वापरत असाल, तर तुम्हाला ते 1 जानेवारीपासून वापरता येणार नाही. जुनी मॅग्नेटिक स्ट्राईप डेबिट आणि क्रेडिट कार्ड 31 डिसेंबरला बंद होणार असून ग्राहकांना ती बदलून घेण्याचे निर्देश आरबीआयने दिले आहेत. जुनी कार्ड बदलण्याची प्रक्रिया 31 डिसेंबरपूर्वीच करण्यास सांगण्यात आलं होतं. यानंतर मॅग्नेटिक स्ट्राईप असणारी सर्व कार्ड्स ब्लॉक करण्यात येतील. व्हॉट्सअॅप व्हॉट्सअॅप आता आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग होत चालला आहे. परंतु जर हे व्हॉट्सअॅप आपल्या मोबाईलमध्ये वापरता आले नाही तर मोठी पंचाईत होऊ शकते. 31 डिसेंबरनंतर जुन्या ऑपरेटिंग सिस्टीम असलेल्या नोकिया, अॅन्ड्रॉईड आणि अॅपल कंपनीच्या मोबाईल्समध्ये व्हॉट्सअॅप वापरता येणार नाही. नोकिया मोबाईल्समध्ये एस 40 ही ऑपरेटिंग सिस्टिम एके काळी खूप लोकप्रिय होती. या ऑपरेटिंग सिस्टिमवर चालणाऱ्या फोनमध्ये 31 डिसेंबरनंतर व्हॉट्सअॅप चालणार नाही. तसेच अॅन्ड्रॉईड 2.3.7 आणि जुन्या व्हर्जनसोबत आय फोन आयओएस 7 वर 1 फेब्रुवारी 2020 नंतर व्हॉट्सअॅप चालणार नाही. आयफोन बॅटरी बदलण्याची संधी आयफोन यूझर्सना मोबाईलची बॅटरी बदलण्याची शेवटची संधी होती. 'अॅपल'कडून जगभरातील यूझर्ससाठी बॅटरीच्या किंमती कमी करण्यात आल्या होत्या. 31 डिसेंबर 2018 पर्यंत ही ऑफर मर्यादित होती. आयफोनच्या जुन्या मॉडेलमधील बॅटरीमुळे मोबाईलच्या कार्यक्षमतेवर परिणाम होत आहे हे लक्षात आल्यानंतर अॅपलकडून बॅटरी बदलण्यासाठी यूझर्सना आवाहन करण्यात आलं होतं. तसेच बॅटरीच्या किंमतीवरही मोठ्या प्रमाणात सूट देण्यात आली होती. आयटीआर रिटर्न जर तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न म्हणजे आयकर परतावा भरण्याची 31 ऑगस्ट 2018 चुकवली होतीत, आणि आताची 31 डिसेंबरची तारीखही 'मिस' केली असेल, तर तुम्हाला भरभक्कम दंड भरावा लागणार आहे. 1 जानेवारी 2019 ते 31 मार्च 2019 या कालावधीत उशिराने भरलेल्या आयकर परताव्यासाठी दुप्पट दंड आकारला जाणार आहे. 31 डिसेंबरपूर्वी पाच हजार रुपयांचा दंड आता दहा हजारांवर जाणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Honey Trap : नेत्यांना 'हनी ट्रॅप'मध्ये फसवण्याचा डाव उघड, 'जैश ए मोहम्मद'च्या दहशतवाद्याची गर्लफ्रेंड अर्पिता सरकारला अटक
नेत्यांना 'हनी ट्रॅप'मध्ये फसवण्याचा डाव उघड, 'जैश ए मोहम्मद'च्या दहशतवाद्याची गर्लफ्रेंड अर्पिता सरकारला अटक
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Ajit Doval Pune : भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
Amit Shah On Ajit Doval Pune: अमित शाहांकडून अजित डोवाल यांचं तोंडभरून कौतुक, पंतप्रधान मोदींनी दिलेला महत्वाचा सल्ला आणि पहिल्या भेटीचा किस्सा सांगितला
अमित शाहांकडून अजित डोवाल यांचं तोंडभरून कौतुक, पंतप्रधान मोदींनी दिलेला महत्वाचा सल्ला आणि पहिल्या भेटीचा किस्सा सांगितला

व्हिडीओ

Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Ajit Doval Pune : भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
Raj Thackeray on PM Modi: दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
Embed widget