DCW Chief Swati Maliwal : दिल्ली महिला आयोगाच्या (DCW) प्रमुख स्वाती मालीवाल यांनी स्वत:च्या वडिलांवर बालपणात लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. शनिवारी (11 मार्च) महिला आयोगाने आयोजित केलेल्या पुरस्कार सोहळ्यात मालीवाल यांनी आपल्यावरील अत्याचाराबाबत गौप्यस्फोट केलाय. "मी लहान असताना माझ्या वडिलांनी माझ्यावर लैंगिक अत्याचार केले. ते मला मारायचे, जेव्हा ते घरी यायचे तेव्हा मला खूप भीती वाटायची आणि मी पलंगाखाली लपायचे, असे मालीवाल यांनी म्हटले आहे.
"माझे वडील मला बेदम मारहाण करायचे. मी चौथीपर्यंत माझ्या वडिलांसोबत राहिले. माझा विश्वास आहे की जेव्हा एखाद्या व्यक्तीवर अत्याचार होतात तेव्हाच तो इतरांच्या वेदना समजू शकतो. तेव्हाच त्या व्यक्तीच्या आत ती हिंमत येते, ज्याद्वारे तो संपूर्ण व्यवस्था हादरवून टाकू शकतो. कदाचित माझ्या बाबतीतही असेच घडले असेल. मी रात्रभर प्लॅन करत असे की जे पुरुष महिला आणि मुलींसोबत गैरवर्तन करतात त्यांना धडा शिकवेन, असे स्वाती मालीवाल यांनी म्हटले आहे.
"माझे वडील मला मारायचे त्यावेळी ते माझे केस पकडून माझे डोके भिंतीवर आपटत असत. त्यामुळे दुखापत होऊन रक्त वाहत असे. त्यावेळी खूप त्रास सहन केला. पण माझा असा विश्वास आहे की जेव्हा एखाद्या व्यक्तीवर खूप अत्याचार होतात तेव्हाच ती व्यक्ती इतरांच्या वेदना समजू शकते. तेव्हाच त्या व्यक्तीच्या आत अशी आग जागृत होते, ज्यामुळे ती व्यक्ती संपूर्ण यंत्रणा हादरवून टाकू शकते. कदाचित माझ्यासोबतही असेच घडले असेल आणि आमच्या सर्व पुरस्कार विजेत्यांची व्यथा सारखीच असेल, असे मालीवाल यांनी म्हटले आहे.
कोण आहेत स्वाती मालीवाल?
स्वाती मालीवाल या दिल्ली महिला आयोगाच्या (DCW) अध्यक्षा आहेत. 2021 मध्ये स्वाती यांना सलग तिसऱ्यांदा DCW ची जबाबदारी देण्यात आली. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षांना दुसरी टर्म देण्याच्या निर्णयाला मंजुरी दिली होती. स्वाती 2015 पासून दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा आहेत. अलीकडेच त्यांनी दिल्लीच्या रस्त्यांवर महिलांच्या सुरक्षेबाबत कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती जाणून घेतल्याचा दावा केला होता. तेव्हा त्या चर्चेत आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी ट्विट करून म्हटले होते की, "रात्री उशिरा त्या दिल्लीतील महिला सुरक्षेच्या स्थितीचा आढावा घेत होत्या. त्यावेळी मद्यधुंद अवस्थेत कार चालकाने त्यांचा विनयभंग केला. त्यांनी त्याला पकडले असता कारच्या आरशात हात पकडून चालकाने त्यांना फरफटत नेहले. सुदैवाने माझे प्राण वाचवले. दिल्लीत महिला आयोगाच्या अध्यक्षा सुरक्षित नसतील तर परिस्थिती काय असेल याची कल्पना करा." असे ट्वीट मालीवाल यांनी केले होते.