मुंबई : ज्या घरातील कोणतीही व्यक्ती बँकेत नोकरी करते, अशा घरात मुस्लिम कुटुंबाने आपल्या मुलाचं वा मुलीचं लग्न लावून देऊ नये, असा फतवा दारुल उलूमने जारी केला आहे. बँकिंग क्षेत्रात नोकरी करुन मिळालेला पैसा अनैतिक असल्याचा अजब दावा दारुल उलूमने केला आहे.
इस्लाम धर्मातील कायदे किंवा शरीयतनुसार व्याजावर पैसे देणं आणि घेणं अनैतिक आहे. अनैतिक व्यवसायात गुंतवणूक करणंही चूक आहे. संपूर्ण बँकिंग व्यवस्थाच व्याजावर आधारित असल्यामुळे हा फतवा काढला गेल्याचा दावा दारुल उलूमने केला आहे.
मला लग्नासाठी एक स्थळ आलं आहे, त्या मुलीचे वडील बँकेत नोकरी करतात. तर मी त्या तरुणीशी लग्न करु का, असा प्रश्न एका तरुणाने विचारला होता. त्यानंतर देवबंद उलूमने हा फतवा जारी केला.
जगातील काही देशांमधील इस्लामी बँका व्याजमुक्त बँकिंगच्या सिद्धांतावर काम करतात. इस्लाम धर्मात गुंतवणुकीतून दुसऱ्यांच्या मेहनतीवर लाभ मिळवणं चूक मानलं जातं.
मुस्लिमांनी बँक कर्मचाऱ्यांच्या घरात लग्न करु नये, दारुल उलूमचा फतवा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
05 Jan 2018 11:17 AM (IST)
इस्लाम धर्मात व्याज देणं अनैतिक आहे, संपूर्ण बँकिंग व्यवस्थाच व्याजावर आधारित असल्यामुळे हा फतवा काढल्याचा दावा दारुल उलूमने केला आहे.
बँकेत जर आपलं काही महत्त्वाचं काम असेल तर जून महिन्यातच ते आटोपून घ्या कारण की, जुलै महिन्यात बँका तब्बल 11 दिवस बंद राहणार आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -