एक्स्प्लोर
Advertisement
VIDEO : गोविंदाच्या गाण्यावर योग डान्स, अश्लीलतेचा आरोप
ग्वाल्हेर : योग म्हटल्यावर तुमच्या डोळ्यासमोर येत असतील एखादे ध्यानस्थ योगगुरु किंवा आसनं शिकवणारे एखादे गुरुजी. मात्र ग्वाल्हेरच्या एका योग शिबिरात चक्क बॉलिवूडच्या गाण्यांवरच योग डान्स सुरु असल्याचं समोर आलं आहे.
ग्वाल्हेरमध्ये आयोजित केलेल्या 10 दिवसांच्या एका योग शिबिरात हिंदी गाण्यांवर अनोखा डान्स सुरु होता. मुळात या डान्सला योग म्हणावं का, असाही प्रश्न पडतो. गोविंदा आणि करिष्मा कपूरच्या 'तुझको मिर्ची लगी तो मै क्या करु' या गाण्यावर शेकडो स्त्री पुरुष अक्षरशः थिरकत होते.
विशेष म्हणजे या शिबिरात योगगुरु देखील जीन्स आणि शर्ट घालून भक्तांसोबत डान्स करत होते. पुरुषांनी तर शर्ट उतरवून या डान्समध्ये सहभाग घेतला.
शिबिरात अश्लीलता पसवल्याचा आरोप अभाविपने केला आहे. अभाविपच्या कार्यकर्त्यांनी शिबिरावर आक्षेप घेत पोलिसात तक्रार केल्यानंतर शिबिर बंद पाडलं.
पाहा व्हिडिओ :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
टेलिव्हिजन
मुंबई
बीड
ठाणे
Advertisement