Oil Reserve In Bihar : संपूर्ण भारताचे लक्ष पुन्हा एकदा बिहारकडे लागले आहे. बिहारमधील जमुईत सोन्याची खाण सापडल्याचे वृत्त समोर आल्यानंतर आता पेट्रोलियम पदार्थांचे भांडार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बिहारमधील बक्सर आणि समस्तीपूरमध्ये पेट्रोलियम पदार्थाचे साठे असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ऑइल अॅण्ड नॅच्युअरल गॅसकडून (ONGC) याचा शोध घेतला जाणार आहे. याबाबत भारत सरकारने पाठवलेल्या प्रस्तावाला बिहार सरकारने नुकतीच परवानगी दिली आहे.  


समस्तीपूर जिल्ह्यातील 308 किलोमीटर आणि बक्सर जिल्ह्यातील काही भागात पेट्रोलियम पदार्थाचे साठे मिळाल्याचे संकेत मिळाले आहेत. केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी सांगितले की, ओएनजीसीला समस्तीपूरच्या गंगा खोऱ्यात पेट्रोलियम पदार्थाच्या साठ्याचा शोध घेण्यासाठी बिहार सरकारने मंजुरी दिली आहे. समस्तीपूरमध्ये 308 चौकिमी क्षेत्रात खनिज तेलाच्या साठ्याचा शोध अत्याधुनिक पद्धतीने घेतला  जाणार आहे. 


समस्तीपूरमधील गंगा खोऱ्यात खनिज तेलाचा साठा असल्याचे अंदाज लावण्यात आला आहे. हा अंदाज पूर्णपणे सत्यात उतरेल असा विश्वास गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी व्यक्त केला. या भागात खनिज तेलाचा साठा सापडल्यास  समस्तीपूर आणि बिहार नव्या दिशेने जाईल असेही त्यांनी म्हटले. 


ओएनजीसीने बक्सर जिल्हा प्रशासनाला याबाबत पत्रही पाठवले आहे. त्यामुळे वाळू आणि पुराचा सामना करावा लागत असलेल्या या भागातील भूगर्भात खनिज तेलाचा साठा मिळण्याची शक्यता आहे. 


बक्सरमध्ये 52.13 किमी आणि समस्तीपूरमध्ये खनिज तेलाचे मोठे साठे असू शकतात असा अंदाज ओएनजीसीने व्यक्त केला आहे. ONGC ने बिहारच्या खाण आणि भूविज्ञान विभागाकडून पेट्रोलियम उत्खननासाठी परवान्यासाठी अर्ज केला आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: