Petrol Diesel Price Today : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर वधारले आहेत. कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल 93 डॉलरच्या घरात गेले आहेत. इंधन कंपन्यांना तेल खरेदीसाठी अधिक पैसे मोजावे लागत आहेत. इंधन कंपन्यांकडून आजही पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर ठेवण्यात आले आहेत. पाच राज्यांमध्ये सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इंधन दरवाढ टळली असल्याचे म्हटले जात आहे. मागील 94 दिवसांपासून इंधन दर स्थिर आहेत. 


मुंबई शहरांत (Petrol-Diesel Price In Mumbai) पेट्रोलची किंमत 109.98 रुपये प्रति लिटर आहे. तर डिझेलची किंमत 94.14 रुपये प्रति लिटर इतकी आहे. दिल्लीत पेट्रोलचा दर प्रति लिटर ९५.४१ रुपये इतका आहे. चेन्नईत प्रति लिटर १०१.४० रुपये आहे. कोलकात्यात एक लिटर पेट्रोलसाठी १०४.६७ रुपये मोजावे लागत आहेत.


देशातील चार महानगरांसह प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल प्रमाणे डिझेलचेही दर स्थिर आहेत. मुंबईत डिझेलचा दर प्रति लिटर 94.14 रुपये आहे. तर, दिल्लीत 86.67 रुपये आहे. चेन्नईत डिझेलचा दर 91.43 रुपये प्रति लिटर असून कोलकात्यात 89.79 प्रति लिटर इतका आहे. 


 2014 नंतरचा कच्च्या तेलाच्या दराचा उच्चांक 


आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्चा तेलाच्या दराने उच्चांक गाठला आहे. शुक्रवारी ब्रेंट क्रूडच्या दरात 2.4 टक्क्यांनी वाढ झाली. आंतरराष्ट्रीय बाजारात ऑक्टोबर 2014 नंतर एवढी उच्चांकी दरवाढ झाली आहे. सलग सात आठवडे कच्च्या तेलाच्या दरात वाढ होत आहे.