Medical College Fees : राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने वैद्यकीय महाविद्यालयांमधील शुल्काबाबत मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहेत. या नव्या मार्गदर्शक तत्वांमुळे खासगी वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. या नव्या मार्गदर्शक तत्वांनुसार आता खासगी वैद्यकीय महाविद्यालयातील 50 टक्के जागांवरील शुल्क हे सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांप्रमाणे असणार आहे. 


एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने (National Medical Commission) विस्तृत विचारविनिमय केल्यानंतर हा निर्णय घेतला आहे. या नव्या निर्णयानुसार खासगी आणि अभिमत विद्यापीठातील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमधील शुल्क हे राज्यातील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातील शुल्कांइतके असतील. शासकीय कोट्यातून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे. परंतु संबंधित वैद्यकीय महाविद्यालय किंवा डीम्ड युनिव्हर्सिटीच्या एकूण मंजूर संख्येच्या 50 टक्क्यांपर्यंत ही शुल्क रचना लागू असणार आहे. 


 






राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने वैद्यकीय महाविद्यालयातील शुल्क रचनेबाबत निर्णय घेण्यासाठी एक तज्ज्ञ समिती स्थापन केली होती. या समितीसमोर जवळपास 1800 जणांनी आपले म्हणणे सादर केले. यामध्ये सामान्य नागरीक, पालक, वैद्यकीय क्षेत्रातील संस्था, संघटना आदींचा समावेश होऊ शकतात. या तज्ज्ञ समितीने केलेल्या शिफारसी राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने  29 डिसेंबर रोजी झालेल्या बैठकीत स्वीकारल्या. 


सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाप्रमाणे शुल्क आकारणी होणार असल्यामुळे विद्यार्थी-पालकांना दिलासा मिळणार आहे. मागील काही वर्षात वैद्यकीय शिक्षण शुल्कात वाढ होत आहे. त्यामुळे अनेकांना वैद्यकीय शिक्षणाचा पर्याय सोडून द्यावा लागत आहे. काही राज्यांमध्ये खासगी महाविद्यालयांच्या तुलनेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील शुल्क हे अतिशय कमी आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या:


सोमय्यांना ठार मारण्याचा प्रयत्न, ही लोकशाही आहे की गुंडाराज, चंद्रकांत पाटील संतापले


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha


 



Education Loan Information:

Calculate Education Loan EMI