नवी दिल्ली: येत्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडवेळी केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) पॅनोरॅमिक फोर आय नाईट व्हिजन गॉगल (panoramic four-eyed night vision goggles) चा वापर करुन आपल्या वॉरफेअर गॅझेटचे प्रदर्शन करणार आहे. अशा प्रकारचे गॉगल्स ओसामा बिन लादेनला ठार मारण्यासाठी अमेरिकेच्या नेव्ही सील्सद्वारे राबवलेल्या मिशनमध्ये वापरण्यात आले होते.


सीआरपीएफच्या सूत्रांनी असा दावा केला आहे की, भारतातील सर्वात मोठ्या केंद्रीय सशस्त्र पोलीस दल प्रथमच अशा प्रकारच्या युद्ध गॅझेटचे प्रदर्शन करणार आहे. या गॉगलची ख्याती ही 'नाईट व्हिजनचा राजा' अशी आहे. हे गॉगल या वर्षीच्या सीआरपीएफ परेड कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण असेल.


Indian Army Day 2021 | दरवर्षी 15 जानेवारीला का साजरा केला जातो सैन्य दिवस? या दिवसाचं महत्व काय?


हे अशा प्रकारचे खास बनवण्यात आलेले सुसज्ज गॉगल रात्रीच्या वेळी जवानास 120 डिग्रीमध्ये पाहण्याची दृष्टी प्रदान करतात. ते वजनाला अत्यंत हलके असतात आणि रात्रीच्या ऑपरेशनच्या दरम्यान ते हेल्मेटवर घालता येतात.


सीआरपीएफच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, फोर आय नाईट व्हिजन गॉगल्स अमेरिकेच्या नेव्ही सील्ससह जगातील विविध सैन्य दलांद्वारे वापरण्यात आले आहेत. कमांडो अंधारातसुद्धा आपले लक्ष्य सहजपणे ओळखू शकतात. सीआरपीएफ कमांडो पहिल्यांदाच त्यांना परिधान करणार आहेत. सीआरपीएफच्या अधिकाऱ्याने हेही सांगितले की सीआरपीएफकडून वापरण्यात येणारे गॉगल्स हे यूएस नेव्ही सील्सद्वारे वापरलेला गॉगलच्या एका प्रकारातील आहेत.


India-China Standoff | LAC वर कोणत्याही आव्हानांचा सामना करण्यास तयार: लष्कर प्रमुख


यूएस नेव्ही सीलचे माजी मुख्य वॉरफेअर ऑपरेटर मॅट बिसोन्नेट यांनी आपल्या 'नो इझी डे' या पुस्तकात असं लिहलं आहे की हा गॉगल वापरताना आपण एखाद्या टॉयलेट पेपर ट्यूबमधून पाहतोय असा भास होतो.


त्यांनी आपल्या या पुस्तकात लिहलंय की, "या मिशनमध्ये भाग घेतलेल्या प्रत्येक सैनिकाला 65 हजार डॉलर्स किंमतीचे प्रत्येकी दोन असे फोर-ट्यूब नाईट-व्हिजन गॉगल्स (NVGs) देण्यात आले होते. इतर युनिटला दोन ट्यूबचे गॉगल देण्यात येतात, तर आम्हाला चार ट्यूबचे गॉगल देण्यात आले होते. त्यामुळे आम्हाला 120 डिग्रीमध्ये पाहण्याची सुविधा उपलब्ध झाली. या स्टॅन्डर्ड गॉगलमधून पाहताना टॉयलेट पेपर ट्यूबमधून पाहिल्यासारखे वाटायचे."


या गॉगल व्यतिरिक्त, सीआरपीएफकडून आगामी प्रजासत्ताक दिनाच्या परेडच्या वेळी गन शॉट डिटेक्शन सिस्टम आणि वेपन माउंटन थर्मल साइट हे उपकरणही असतील.


पुलवामा हल्ला पाकिस्तान सरकारने घडवला, पाकिस्तानच्या संसदेत मंत्री फवाद चौधरींची कबुली