Cristiano Ronaldo Statue in Goa : फुटबॉल विश्वातील (Football) अव्वल दर्जाचा खेळाडू असणारा ख्रिस्तियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) याचा एक भव्य पुतळा गोवा राज्यातील (Goa) पणजी येथे उभारण्यात आला आहे. पण याच पुतळ्यामुळे (Cristiano Ronaldo Statue) एका नव्या वादाला तोंड फुटलं असून तेथील रहिवाशांनी भारताच्या खेळाडूऐवजी पोर्तुगीज फुटबॉलपटूचा पुतळा उभारल्यामुळे यावरुन आक्षेप घेतला आहे.
गोवा राज्य सरकारमधील मंत्री मायकल लोबो यांनी मंगळवारी फुटबॉल खेळाला आणखी प्रोत्साहन देण्यासाठी आणि तरुणांना हा खेळ खेळण्यासाठी अधिक प्रेरित करण्याच्या उद्देशाने फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या पुतळ्याचं अनावरण केलं. पण यानंतर तेथील काहीजण भारतीय फुटबॉलपटू सोडून परदेशी फुटबॉलपटूला सन्मानित करण्याच्या निर्णयावर संतप्त झाले. तसंच गोव्यावर राज्य केलेल्या पोर्तुगिजांच्या देशातील खेळाडूची निवड हा एक विशिष्ट अपमान असल्याचं सांगितलं जात आहे.
गोव्याच्या पणजी या मुख्य शहरात 400 किलोच्या (882-पाऊंड) पुतळ्याचे अनावरण झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी काळे झेंडे घेऊन निदर्शक निषेध करण्यासाठी त्या जागेवर एकत्र आले. गोव्यातील पुतळ्याबाबत रोनाल्डोने जाहीरपणे भाष्य केलेले नाही. त्यामुळे आता या निषेधानंतर या पुतळ्याबाबत काय निर्णय घेतला जाणार हे पाहावे लागेल.
हे ही वाचा :
- Goa : कोरोनाचे नियम पाळा, अन्यथा...; ख्रिसमस आणि नववर्षाच्या स्वागतासाठी येणाऱ्या पर्यटकांना राज्य सरकारचा इशारा
- Goa : गोव्यात घमासान! पिता-पुत्र असलेले प्रतापसिंह राणे आणि विश्वजीत राणे निवडणुकीत एकमेकांसमोर शड्डू ठोकणार
- Goa Congress : गोव्यात काँग्रेसला भगदाड, आतापर्यंत 17 पैकी 15 आमदारांचा पक्षाला रामराम
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha