CISF Training : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल म्हणजेच सीआयएसएफ जवान सराव करत असताना दुर्दैवी घटना घडली आहे. फायरिंग रेंजजवळ खेळत असलेल्या एका 11 वर्षीय चिमुकल्याच्या डोक्यात गोळी लागल्याची घटना घडली आहे. तामिळनाडूमधील पडुकोट्टई जिल्हयात गुरुवारी हा प्रकार घडला आहे. नरथमालाई गावांत सीआयएसएफ (सेंट्रल इंडस्ट्रियल सक्योरिटी फोर्स) जवानांच्या सरावादरम्यान जवळच खेळत असलेल्या 11 वर्षीय मुलाच्या डोक्यात गोळी लागली. यामध्ये मुलगा गंभीर जखमी झाला आहे. उपचारासाठी मुलाला जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या 11 वर्षीय मुलाचं नाव पुगझेंदी असे आहे. पुगझेंदी सीआयएसएफच्या फायरिंग रेंजजवळ आजोबांच्या घराबाहेर खेळत होता, त्यावेळी एक गोळी मुलाच्या डोक्याला लागली आहे. त्यामुळे तो गंभीर जखमी झाला. या मुलाला उपचारासाठी तंजावुर मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आलं आहे.  


नरथमालाई येथे गुरुवारी सीआयएसएफ जवानांसाठी प्रशिक्षण सत्र आयोजित करण्यात आलं होतं. त्यावेळी सरावादरम्यान एका जवानाची गोळी फायरिंग रेंजवळ खेळत असलेल्या 11 वर्षीय मुलाच्या डोक्याला घासून गेली. यामध्ये तो गंभीर जखमी झाला. सीआयएसएफ अधिकाऱ्यांनी तात्काळ जखमी मुलाला उपचारासाठी सरकारी रुग्णालयात दाखल केलं. मुलगा गंभीर जखमी असल्यामुळे त्याला पुढील उपचारासाठी तंजावुर येथील रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सीआयएसएफ जवानांनी झाडलेली गोळी मुलाच्या डोक्यात आहे. तंजावुर सरकारी रुग्णालयात त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. 


पडुकोट्टई पोलिसांकडून या घटनेचा तपास करण्यात येत आहे. ज्या सीआयएसएफ जवानांच्या रायफलमधून गोळी निघाली, त्याची विचारपूस सुरु करण्यात आली आहे. प्रसारमाध्यमांच्या माहितीनुसार, गोळी लागल्यामुळे 11 वर्षीय मुलगा बेशुद्ध आहे, डोक्यातून गोळी काढण्यासाठी तंजाावुर रुग्णलयात सर्जरी करण्यात येणार आहे, असे पडुकोट्टई  मेडिकल कॉलेज रुग्णालयाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. 


मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live 



तर महत्त्वाच्या बातम्या:



Omicron Community Spread? : काळजी घ्या, धोका वाढतोय! मुंबई, पुण्यात ओमायक्रॉनचा समूह संसर्ग?