UPDATE : पंतप्रधान नरेंद्र मोदी केरळमध्ये पोहोचले
UPDATE : केरळच्या पुत्तिंगल देवीच्या मंदिरात अग्नितांडव, पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीहून केरळच्या दिशेने रवाना
कोल्लम : केरळमधील पुत्तिंगल देवीच्या मंदिरात घडलेल्या अग्नितांडवात 102 हून अधिक लोकांचा जीव गेला आहे. तर 200 हून अधिक जखमी झाले आहेत.
https://twitter.com/narendramodi/status/719000464033849344
कोल्लम जिल्ह्यातील परवुर या ठिकाणच्या पुत्तिंगल देवीच्या मंदिरात ही घटना घडली. नवरात्र उत्सवानिमित्त पहाटे पाचच्या सुमारास याठिकाणी फटाक्यांची आतषबाजी होत होती. त्यापैकी एक ठिणगी जवळच्या फटाक्यांच्या दुकानावर जाऊन पडल्यानं आग भडकली.
https://twitter.com/narendramodi/status/719002936521527297
त्यानंतर एकामागोमाग एक स्फोट झाले. महत्वाचं म्हणजे यावेळी मंदिरात पाच हजारांहून अधिक लोक उपस्थित होते.
स्थानिकांच्या माहितीनुसार मंदिर परिसरात पेंट कंटेनरही असल्यानं या आगीनं अधिक रुद्र रुप धारण केलं. आगीमुळे मंदिर, परिसरातले घरं यांचंही मोठं नुकसान झालं आहे.
सर्व जखमींवर सध्या उपचार सुरु करण्यात आले आहेत. तर पंतप्रधान मोदींनी मृतांच्या नातलगांना 2 लाख तर जखमींसाठी 50 हजारांची मदत जाहीर केली आहे.
पुत्तिंगल देवीच्या मंदिरात अतषबाजीची परंपरा
पुत्तिंगल देवीच्या मंदिरातील आग फटाक्यांच्या आतषबाजीमुळे झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे. पुत्तिंगल देवीच्या मंदिरात फटाक्यांची आतषबाजी करणं ही सर्वसामान्य बाब असून नव्या वर्षानिमित्त इथे आतषबाजी केली जाते. तशी परंपराच आहे. 14 एप्रिलला मल्याळम नववर्ष सुरु होतं. त्यानिमित्तानंच ही आतषबाजी केली जाते.