Covid19 Vaccine : एकीकडे देशात कोरोना (Corona) चा वाढता संसर्ग कायम असताना देशात लसीकरणावर (Covid19 Vaccine) भर दिला जात आहे. अशात मीडिया रिपोर्ट्सनुसार, लस उपलब्धतेत कमतरता असल्यामुळे राज्य सरकार लसीकरणाची गती वाढवू शकत नाही असे बोलले जात होते. मात्र केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Central Health Ministry) या वृत्ताचे खंडन केले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले की राज्याकडे कोवॅक्सिन लसीचा 24 लाखांहून अधिक डोसचा साठा आहे त्याशिवाय राज्याला शुक्रवारी अतिरिक्त 6.35 लाख डोस मिळाले असल्याचे केंद्राने म्हटलंय.


मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, ''कोविन अ‍ॅपवर (Co-WIN App) उपलब्ध साप्ताहिक लसीकरणाच्या आकडेवारीनुसार, 18 वर्षांखाली अल्पवयीन मुलामुलींच्या लसीकरणासाठी राज्याला कव्हर करण्यासाठी आणि बूस्टर डोस (Booster Dose) साठी महाराष्ट्राचा कोवॅक्सिन लसीचा सरासरी वापर दररोज सुमारे 2.94 लाख डोस इतका आहे. राज्याकडे कोवॅक्सिन लसीचा आतापर्यंत न वापरलेल्या  24 लाखांहून अधिक डोसचा साठा आहे. त्यामुळे, राज्याकडे 10 दिवसांच्या लसीकरणासाठीचा लसीचे मुबलक डोस आहेत. 


त्यापुढे मंत्रालयाने म्हटले आहे की, "याशिवाय, कोविश्लिड (Covishield) साठी, राज्यात आजपर्यंत मिळालेल्या साठ्यामधील 1.24 कोटी शिल्लक डोस उपलब्ध आहेत. कोविशिल्डच्या लसीचा दररोज सरासरी वापर 3.57 लाख इतका आहे. हा साठा 30 दिवसांपेक्षा जास्त काळ लसीकरणासाठी पुरेसा आहे." असे ते म्हणाले. म्हणाला. त्यामुळे, मीडिया रिपोर्ट्सने दिलेली माहिती चुकीची असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.


महत्त्वाच्या बातम्या



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha