अमेरिकेत कोरोना संसर्ग पुन्हा एकदा वेगाने पसरत आहे.याच दरम्यान मॉडर्ना कंपनीने कोरोना लस बनवल्याचा दावा केला आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार त्यांनी तयार केलेली लस संसर्ग रोखण्यासाठी 94 टक्के प्रभावी आहे. यासह कंपनीने म्हटले आहे की कोविड 19 लसीच्या एका डोससाठी सरकार 25 ते 37 अमेरिकन डॉलर्स आकारेल. म्हणजेच कंपनी मॉर्डना लसीसाठी 1,854 ते 2,744 रुपये घेऊ शकते.


लसीचे दर मागणीवर अवलंबून


मोडर्नाचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्टीफन बॅन्सेलने जर्मन साप्ताहिक वेल्ट अम सॉन्टाग (डब्ल्यूएएमएस) यांना सांगितले की आमच्या लसीची किंमत 10 ते 50 डॉलर म्हणजेच 741.63 ते 3,708.13 रुपये असू शकते. ते म्हणाले की लसीची किंमत ही तिच्या मागणीवर अवलंबून असते.


कोरोना लसीची भारतात किंमत काय असेल? सीरम इन्स्टिट्युटचे अदार पुनावाला म्हणतात...


युरोपियन युनियनला मोडर्नाबरोबर करार करायचा होता. चर्चेत सहभागी झालेल्या युरोपियन युनियनच्या अधिकाऱ्याने अशी माहिती दिली की, युरोपियन युनियनला लाखो डोसची गरज भासणार आहे. अशा परिस्थितीत युरोपियन युनियनला 25 डॉलरपेक्षा कमी किंमतीच्या म्हणजेच 1,854 पेक्षी कमी किंमतीत मोडर्ना कंपनीसोबत करार करायचा होता.


यूरोपीय संघ आयोग कराराच्या जवळ


युरोपियन युनियनशी झालेल्या कराराबाबत बँन्सेल म्हणतात की, "अद्याप कोणत्याही गोष्टीवर स्वाक्षरी झालेली नाही, परंतु आम्ही युरोपियन युनियन कमिशनशी झालेल्या कराराच्या जवळ आहोत, आम्हाला युरोपमध्ये पोहोचायचं आहे आणि करारावर विधायक वाटाघाटी करायच्या आहेत."


वर्षाच्या अखेरीस दोन कोटी डोस लस तयार होणार


मॉडर्नच्या म्हणण्यानुसार, क्लिनिकल चाचणीच्या अंतरिम डेटामध्ये, त्याची लस कोरोना रोखण्यासाठी 94.5 टक्के पर्यंत प्रभावी आहे. कंपनी असेही म्हणाली आहे की, त्याची लस Mrna-1273 लवकरच येईल आणि वर्षाच्या अखेरीस कंपनी या लसीचे दोन कोटी डोसदेखील तयार करेल.