Benefits Of Covaxin Booster Dose : देशात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यामध्ये ओमायक्रॉन आणि त्याच्या सब व्हेरियंटच्या रुग्णांचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळे त्यावर कोवॅक्सिन लस किती प्रभावी ठरते? याची चर्चा सुरु झाली आहे. ICMR च्या अभ्यासात अनेक गोष्ट समोर आल्या आहेत. कोवॅक्सिन लसीचा बुस्टर डोस (Covaxin Booster Dose) कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंटविरोधात प्रभावी आहे. त्याशइवाय ओमायक्रॉनच्या बीए.1.1 आणि बीए.2 व्हेरिंयटविरोधात रोग प्रतिकारक शक्ती मजबूत करते.  आयसीएमआर (ICMR) आणि भारत बायोटेक (Bharat BioTech) यांच्या अभ्यासात ही बाब समोर आली आहे.  
 
सिरीयन हॅमस्टर मॉडलमध्ये कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंटविरोधात लसीकरणाचे दोन अथवा तीन डोसनंतर भारत बायोटेकच्या कोवॅक्सिनद्वारे मिळणारी सुरक्षा आणि ओमायक्रॉनच्या सब व्हेरियंटविरोधात किती प्रभावी ठरते, याचा अभ्यास करण्यात आला. मंगळवारी या अभ्यासातील निष्कर्ष बायोआरक्सिवमध्ये प्रकाशित करण्यात आला. 


कोवॅक्सिनच्या बुस्टर डोसवर काय म्हणाले ICMR?
आयसीएमआर आणि भारत बायोटेक यांनी म्हटलेय की,  डेल्टा विषाणूच्या संक्रमणाबाबत केलेल्या अभ्यासात दुसऱ्या आणि तिसऱ्या डोसमधील सुरक्षेची तुलना केली... त्यावेळी बूस्टर डोसचा अधिक फायदा होत असल्याचे समोर आलेय. तिसऱ्या डोसनंतर फुफुसातील आजार कमी होत असल्याचे समोर आलेय.  


तिसऱ्या डोसमुळे काय फायदा?
तिसऱ्या डोसनंतर ओमायक्रॉनच्या सब व्हेरियंट (Omicron Variants) -बीए.1 आणि बीए. 2 विरोधात रोगप्रतिकारक शक्ती वाढते. शरिरातील अँटिबॉडी आणखी जास्त प्रमाणात तयार होतात, असे अभ्यासात समोर आलेय.  कोवॅक्सिनच्या  बूस्टर डोसमुळे (Covaxin Booster Dose) अधिक प्रमाणात अँटिबॉडी तयार होतात, त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते... त्यामुळे डेल्टा आणि ओमायक्रॉनची (Delta And Omicron Variant) तीव्रता कमी होण्यास मदत होते, असे अभ्यासात दिसून आलेय.  


इतर महत्त्वाच्या बातम्या