100 Crore Vaccination LIVE Updates: भारताने इतिहास घडवला, देशवासियांचे आभार : पंतप्रधान नरेंद्र मोदी

Breaking News LIVE Updates, 21 October 2021: दिवसभरातील कोरोना लसीसंबंधी ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना लसीकरणाच्या संबंधित सर्व अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

abp majha web team Last Updated: 21 Oct 2021 12:32 PM
आजचा दिवस ऐतिहासिक, 130 कोटी देशवासियांच्या सामूहिक इच्छाशक्तीचा परिणाम: पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधानांच्या नेतृत्वामुळे हे यश शक्य, त्यांचे अभिनंदन: अदर पुनावाला

लसीकरणाचा 100 कोटी डोसचा टप्पा पार, प्रत्येक रेल्वे स्थानकात अनाउन्समेंट सुरु

देशातील लसीकरणाच्या 100 कोटी डोसचा टप्पा ओलांडल्यानंतर त्याचं यश साजरं करण्यासाठी गायक कैलाश खेर यांच्या आवाजात एक थीम सॉंग लाँच करण्यात आलं आहे. भारताने आज जो शंभर कोटी लसींचा टप्पा पार केलाय, त्यासाठी ठीक ठिकाणी सेलिब्रेशन सुरू आहे. या महत्त्वपूर्ण दिवसाबाबत माहिती देण्यासाठी प्रत्येक रेल्वे स्थानकात अनाउन्समेंट केली जात आहे. या अनाउंसमेंटमधून आजच्या दिवसाची माहिती दिली जातेय. सोबतच ज्या ज्या कर्मचाऱ्यांमुळे केवळ नऊ महिन्यात हे लक्ष गाठता आलं त्या सर्वांचे आभार देखील मानले जात आहेत. मराठी, हिंदी आणि इंग्लिश अशा तिन्ही भाषांमध्ये सध्या अनाउन्समेंट सुरू आहे.

पार्श्वभूमी

Corona vaccination : ऐतिहासिक...विक्रमी...! देशात लसीकरणाने 100 कोटी डोसचा टप्पा ओलांडला
कोरोनाच्या पहिल्या टप्प्यावेळी देशात कोरोना लसीचा मोठा तुटवडा होता. त्यावेळी संपूर्ण देशाचं लसीकरण करायला अनेक वर्षे जातील अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. देशातील सामान्य नागरिकांना कोरोनाची लस मिळेल का नाही अशीही शंका व्यक्त केली जात होती. पण या सर्वावर मात करत देशाने कोरोना लसीच्या 100 कोटी डोसचा टप्पा पूर्ण केला आहे. या ऐतिहासिक क्षणानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या परिश्रमामुळे आणि देशवासियांच्या सहकार्यामुळे ही गोष्ट साध्य झाल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. 


देशात कोरोनाच्या लसीकरणाला 16 जानेवारी 2021 रोजी सुरुवात झाली आणि पाहता-पाहता आज 100 कोटी डोस पूर्ण झाले. लसीकरणाच्या बाबतीत भारत आता जगात पहिल्या क्रमांकावर आहे. भारतातील अर्ध्याहून जास्त लोकसंख्येने कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. तसेच लहान मुलांच्या लसीच्या चाचणीलाही मंजुरी मिळाली असल्याने येत्या काळात लसीकरणाच्या कार्यक्रमाला आणखी वेग येणार आहे. 


Corona vaccination : आजच्या दिवसाची इतिहासात नोंद केली जाईल; हे यश 130 कोटी जनतेचं: पंतप्रधान नरेंद्र मोदी


देशातील लसीकरणाने आज 100 कोटी डोसचा टप्पा ओलांडला. ही भारतासाठी गौरवास्पद कामगिरी असून हे यश देशातील 130 कोटी जनतेचं असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. हे यश साध्य करणाऱ्या आरोग्य कर्मचारी, फ्रन्टलाईन वर्कर्स, लस निर्मिती करणाऱ्या कंपन्या, शास्त्रज्ञ तसेच आंत्रप्रुनर्स यांचं पंतप्रधानांनी आभार मानलं आहे. 21 ऑक्टोबर 2021 या दिवसाची इतिहासात नोंद केली जाईल असंही पंतप्रधानांनी म्हटलं आहे. 


देशाने आता कोरोना लसीच्या 100 कोटी डोसचे सुरक्षा कवच प्राप्त केल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, "सबका प्रयास ही जी गोष्ट आहे ही सामूहिक इच्छाशक्तीच्या आधारे साध्य करता येते. आजचे यश हे देशातील आरोग्य कर्मचारी, फ्रन्टलाईन वर्कर्स, शास्त्रज्ञ, लस निर्मिती करणाऱ्या कंपन्या, लस वाहतूक करणारे कर्मचारी तसेच 130 कोटी देशवासियांच्या सामूहिक इच्छाशक्तीचा परिणाम आहे. या नंतरच्या काळातही रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना तातडीने उपचार मिळावा याकडे आपले लक्ष असेल."


 




- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.