नवी दिल्ली : कोरोना व्हायरसविरोधात लढा देणाऱ्या योद्धांना आज तिन्ही सैन्य दलाकडून सलामी देण्यात येणार आहे. डॉक्टर, नर्सेस, पोलीस, सफाई कामगार आणि माध्यमांचे प्रतिनिधी कोरोनाविरोधात दोन हात करत आहेत. आपला जीव धोक्यात घालून नागरिकांची सेवा करत आहेत. त्यामुळे या योद्ध्यांना तिन्ही सैन्य दलांकडून विशेष मानवंदना देण्यात येणार आहे.


इंडियन एअर फोर्सतर्फे फ्लाय पास्टचं आयोजन करण्यात आले आहे. काश्मीरपासून ते कन्याकुमारी आणि आसामपासून ते कच्छपर्यंत असे दोन फ्लायपास्ट करण्यात येणार आहे. यामध्ये भारताची अत्याधुनिक फायटर विमाने, ट्रान्सपोर्ट एअर क्राफ्टचा समावेश असणार आहे. तर समुद्रातूनही भारतीय नौदलांकडूनही या योद्ध्यांना सलामी देण्यात येणार आहे. यावेळी 24 बंदरांवरील जहाजांवर विशेष रोषणाई करण्यात येणार आहे.गुजरातच्या पोरबंदर, मुंबई, गोवा, चेन्नई, विशाखापट्टणम, कोलकता येथील बंदरावर सायंकाळी 7 वाजता आकर्षक रोषणाई करण्यात येणार आहे. कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या रुग्णालयांवर नौदलाच्या हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी केली जाईल.


प्रत्येक जिल्ह्यातील कोरोना रुग्णालयाबाहेर लष्कराकडून विशेष बॅण्डचे वादन होणार आहे. सकाळी 10 वाजता एम्स, नरेला क्वारंटाईन सेंटर आणि ब्रिगेड हॉस्पिटलला सकाळी 10.30 वाजता बॅण्डचे वादन करण्यात येणार आहे.


जगभरातील 212 देशांमध्ये कोरोनाचा कहर सुरुच आहे. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार जीवघेण्या कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत मृत्यूंची संख्या जगभरात 2 लाख 44 हजारांवर पोहोचली आहे.  कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्यांची संख्या 34 लाख 80 हजार 492 हजारांवर पोहोचली आहे. जगभरात 11 लाख 8 हजार रुग्ण बरे झाले आहेत.  मागील 24 तासात 82,398 नवीन कोरोनाबाधितांची भर पडली आहे तर 5,162 जणांचा मृत्यू झाला आहे.


Police in Lockdown | कोरोना योध्यांची काळजी कुणाला? मंत्रीजी, महाराष्ट्रातील पोलिसांच्या व्यथा ऐका




संबंधित बातम्या :