नवी दिल्ली : कोरोना व्हायरस संदर्भातील माहिती देण्यासाठी केंद्र सरकारने लाँच केलेले आरोग्य सेतू अॅप वापरण्याविषयी सरकारने आता काही नियम तयार केले आहेत. त्यानुसार सर्व खासगी आणि सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य सेतू अॅप बंधनकारक करण्यात आलंय. सोबतचं कंटेनमेंट झोनमध्ये राहणाऱ्या सर्व नागरिकांसाठी देखील हे अॅप बंधनकारक असणार आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मात्र आरोग्य सेतू ॲप वर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. ही एक प्रकारे लोकांवर पाळत ठेवण्याची सिस्टिम असल्याची टीका त्यांनी केली आहे. खासगी ऑपरेटरला आऊटसोर्स केल्यामुळे डेटा सिक्युरिटी आणि लोकांच्या प्रायव्हसीचे गंभीर प्रश्न उपस्थित होत असल्याचं त्यांनी म्हटलंय.


कोरोना विषाणूचा विळखा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. आताच्या घडीला देशात 37 हजाराहूंन अधिका लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. या कोरोना विषयी जनजागृती करण्यासाठी आणि लोकांपर्यंत सत्य माहिती पोहचवण्यासाठी केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी आरोग्य सेतू अॅप लाँच केले होते. या अॅपद्वारे वापरकर्त्यांना कोरोना विषयीचे अपडेट हातातल्या मोबाईलमध्ये मिळत होते. हे अॅप देशातील सर्वांनी डाऊनलोड करण्याचं आवाहनही आरोग्य मंत्रालयाकडून करण्यात आले आहे. मात्र, आता केंद्र सरकारने याविषयी नियमावली केली आहे. त्यानुसार खासगी आणि सरकारी कर्मचाऱ्यांना हे अॅप वापरणं बंधनकारक केलं आहे. तर, कंटेनमेंट झोनमध्ये राहणाऱ्या सर्व नागरिकांसाठी देखील हे अॅप वापरणे बंधनकारक आहे. यावरती काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. तंत्रज्ञान आपल्या सुरक्षेसाठी आवश्यक आहे. पण, या भीतीदायक वातावरणाचा उपयोग करून लोकांचा त्यांच्या परवानगीशिवाय माग ठेवला जाऊ नये, असं राहुल गांधी म्हणाले आहेत. त्याविषयी ट्विट करुन काही प्रश्न उपस्थित केले आहेत.





Lockdown 3 | राज्यात लॉकडाऊनमध्ये झोननिहाय शिथिलता; काय सुरु होणार? काय बंद राहणार?


आरोग्य सेतू अॅपचा असा करा वापर




  • आरोग्य सेतू अॅप वापरण्यासाठी आपला फोन नंबर रजिस्टर करा.

  • फोन नंबर टाकल्यावर एक ओटीपी येईल. जो इंटर केल्यावर अपमध्ये रजिस्ट्रेशन होईल.

  • हे एक कोरोना व्हायरस ट्रॅकिंग अॅप आहे

  • इंटर झाल्यानंतर अॅप आपल्याला ब्लूटूथ आणि जीपीएस अॅक्सेस विचारते.

  • आपल्या डिव्हाईसमधून युझरचा डेटा अनक्रिप्टेड फॉर्ममध्ये घेतला जातो

  • अॅप उघडल्यानंतर पर्सनल डिटेल्स विचारली जातात. यामध्ये जेंडर, नाव, वय, व्यवसाय आणि मागील 30 दिवसांच्या ट्रॅव्हल हिष्ट्रीबाबत

  • विचारलं जातं. अर्थात या माहितीला आपण स्कीप देखील करू शकतो.

  • यानंतर अॅपची भाषा निवडावी लागते

  • अपमध्ये सर्व राज्यांमधील हेल्पलाईन नंबर्सची लिस्ट दिली आहे.

  • आपल्याला वाटल्यास आपण या संकटकाळात स्वतःला स्वयंसेवक म्हणून रजिस्टर करू शकता.

  • या अॅपमध्ये इस युझर आपले सेल्फ असेसमेंट करू शकतात.

  • काय आहेत खास फीचर्स

  • आरोग्य सेतु अॅपमध्ये दोन खास फीचर्स आहेत. यात राज्यवार कोविड-19 हेल्पलाईन नंबर्सची लिस्ट दिली गेलीय.

  • तसेच दुसरं म्हणजे सेल्फ असेसमेंट. या फिचरद्वारे आपण स्वतःची चाचणी करू शकतो. यातून तुम्हाला कोरोना धोका आहे की नाही हे

  • लक्षात येण्यास मदत होते.

  • जर तुमच्यामध्ये कोविड-19 ची काही लक्षणं असतील तर हे अप तुम्हाला सेल्फ आयसोलेशनसाठी निर्देश देतं.


Corona Ground Report | कोरोनाचा ग्रामीण भागातील ग्राऊंड रिपोर्ट! तुमच्या जिल्ह्यातील कोरोना अपडेट