अहमदाबाद : देशातील मोठी फार्मा कंपनी कॅडिलाचे अध्यक्ष राजीव मोदी यांचा अखेर घटस्फोट झाला. मोठ्या वादानंतर राजीव मोदी यांनी मंगळवारी (30 ऑक्टोबर) पत्नी मोनिका यांच्यासोबतचा संसार मोडला. या घटस्फोटानंतर मोदींनी मोनिका यांना पोटगीच्या स्वरुपात 200 कोटी रुपये दिले. 26 वर्षांपूर्वी त्यांचा विवाह झाला होता.
काही वर्षांपूर्वी या दोघांमधील वाद समोर आला होता. त्यावेळी मोनिका यांनी राजीव मोदींवर कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप केला होता. "राजीव मागील तीन वर्षांपासून आपल्यावर अत्याचार करत आहेत," अशी तक्रार मोनिका यांनी पोलिसांत नोंदवली होती.
सामंजस्याचे प्रयत्न अयशस्वी
पोलिसांनी तक्रार नोंदवून घेत मोदी यांना समन्सही पाठवला होता. या दोघांमध्ये समेट घटवण्याचाही प्रयत्न करण्यात आला. पण त्यावर काहीही तोडगा निघाला नाही. यानंतर दोघांमध्ये 200 रुपयांच्या पोटगीवर घटस्फोटासाठी सहमती झाली. यानंतर दोघांनी घटस्फोटाचा अर्ज दाखल केला.
मुलगा राजीव मोदींकडेच राहणार
कौटुंबिक न्यायालयाने घटस्फोटाच्या अर्जानंतर सहा महिन्यांचा (समेट होण्यासाठी आवश्यक वेळ) अवधी दिला होता. यानंतर दोघांनी 2012 पासूनच हे नातं संपल्याचं सांगितलं. यानंतर कोर्टाने घटस्फोट मंजूर करत हे प्रकरण निकाली काढलं. अटीनुसार राजीव मोदी यांनी कोर्ट रुममध्येच मोनिका यांना 200 कोटी रुपयांचा ड्राफ्ट सोपवला. दरम्यान, त्यांचा मुलगा राजीव मोदी यांच्यासोबतच राहणार आहे.
'कॅडिला'च्या अध्यक्षांचा घटस्फोट, पत्नीला 200 कोटींची पोटगी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
31 Oct 2018 12:16 PM (IST)
काही वर्षांपूर्वी या दोघांमधील वाद समोर आला होता. त्यावेळी मोनिका यांनी राजीव मोदींवर कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप केला होता.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -