एक्स्प्लोर

हा विजय विकासाचा, देश बदलासाठी तयार : मोदी

मोदी आणि अमित शाहांनी गुजरात आणि हिमाचलच्या जनतेचे मनापासून आभार मानले.

नवी दिल्ली : गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसला आणखी एक धक्का लागला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी प्रतिष्ठेच्या बनलेल्या गुजरातमध्ये भाजपने स्पष्ट बहुमत मिळवलं. हा देश नव्या बदलासाठी तयार असल्याचं गुजरात आणि हिमाचलच्या निकालातून दिसत असल्याचं मोदी म्हणाले. गुजरात आणि हिमाचलच्या विजयानंतर भाजपच्या दिल्ली मुख्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्यासह अनेक मंत्र्यांसह पत्रकार परिषद घेण्यात आली. मोदी आणि अमित शाहांनी गुजरात आणि हिमाचलच्या जनतेचे मनापासून आभार मानले. गुजरातचा विजय हा आनंद द्विगुणित करणारा : मोदी ''गुजरातमध्ये भाजपने मिळवलेला हा अभूतपूर्व विजय आनंद द्विगुणित करणारा आहे. भाजपची सत्ता आल्याचा तर आनंद आहेच, मात्र गेल्या साडे तीन वर्षांपासून म्हणजे मी जेव्हा गुजरात सोडलं, तेव्हापासून भाजपच्या कार्यकर्त्यांनी राज्य समर्थपणे सांभाळलं असल्याचा आनंद होत आहे'', असं मोदी म्हणाले. ''भाजपचा पराभव करण्यासाठी वाट्टेल ते प्रयत्न करण्यात आले. काँग्रेसने जातीय विष पेरण्याचा प्रयत्न केला. मात्र गुजरातच्या जनतेने हे नियोजन यशस्वी होऊ दिलं नाही. जनतेने आणखी जागरुक होण्याची गरज आहे'', असंही मोदी म्हणाले. ... पण विकासाच्या मध्ये येऊ नका : मोदी ''देशात नेहमी निवडणुका होतात, प्रत्येक निवडणूक वेगवेगळ्या पद्धतीने लढवली जाते. 2014 च्या लोकसभा निवडणुकीनंतर देशात विकासाचं वातावरण निर्माण झालं आहे. सरकारचा प्राधान्यक्रम ठरलेला आहे, कुणाला भाजप पसंत असेल किंवा नसेल, पण विकासाच्या मध्ये येऊ नका. भाजपचा जेव्हा पराभव होईल, तेव्ह महिनाभर जल्लोष साजरा करा, यामुळे देशाचं नुकसान होणार नाही'', असं आवाहनही मोदींनी केलं. गुजरातचा विजय असामान्य : मोदी गुजरातमध्ये भाजपला एकदा तरी पाडावं यासाठी संपूर्ण ताकद लावण्यात आली होती. मात्र गुजरातच्या जनतेने हे होऊ दिलं नाही. जातीयवादाचं विष पेरण्यात आलं, ज्याला गुजरातने नाकारलं. गुजरातचा विजय हा आपल्यासाठी असामान्य आहे, असं मोदी म्हणाले. मोदींचं भाषण :

महत्त्वाच्या बातम्या

NEET PG 2026: परीक्षा एकाच सत्रात, प्रत्येक प्रश्नासाठी अतिरिक्त वेळ, घराजवळ केंद्र निवडण्याची मुभा; NEET PG 2026 परीक्षेसाठी नियमांमध्ये मोठा बदल
परीक्षा एकाच सत्रात, प्रत्येक प्रश्नासाठी अतिरिक्त वेळ, घराजवळ केंद्र निवडण्याची मुभा; NEET PG 2026 परीक्षेसाठी नियमांमध्ये मोठा बदल
CWG 2026: 'ईशान्य भारत अन् काश्मीर गायब'; ग्लासगोतील रेस्टॉरंटच्या नॅपकिनवर भारताचा अपूर्ण नकाशा, स्टार बॉक्सर लव्हलिना बोर्गोहेन आणि BFI चा तीव्र आक्षेप
'ईशान्य भारत अन् काश्मीर गायब'; ग्लासगोतील रेस्टॉरंटच्या नॅपकिनवर भारताचा अपूर्ण नकाशा, स्टार बॉक्सर लव्हलिना बोर्गोहेन आणि BFI चा तीव्र आक्षेप
तमिळनाडू सीएम थलापती विजय यांच्याविरोधात 2031 मध्ये भिडू आत्ताच ठरला? विजय यांच्या ज्योतिषानेच केली भविष्यवाणी! म्हणाले, यांच्यामध्येच थेट टक्कर होणार
तमिळनाडू सीएम थलापती विजय यांच्याविरोधात 2031 मध्ये भिडू आत्ताच ठरला? विजय यांच्या ज्योतिषानेच केली भविष्यवाणी! म्हणाले, यांच्यामध्येच थेट टक्कर होणार
Sandeep Deshpande: मोदी 'व्हिक्टिम कार्ड'....; विद्यार्थ्यांना माफ करण्याच्या पंतप्रधानांच्या सोशल मिडियावरील व्हिडीओवर संदिप देशपांडे भडकले
मोदी 'व्हिक्टिम कार्ड'....; विद्यार्थ्यांना माफ करण्याच्या पंतप्रधानांच्या सोशल मिडियावरील व्हिडीओवर संदिप देशपांडे भडकले

व्हिडीओ

Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India Sri Lanka Tour: टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
Khadakwasla Dam : पुणेकरांना दिलासा! खडकवासला अन् वरसगाव धरणं फुल भरली; मुठा नदीत विसर्ग सुरू
पुणेकरांना दिलासा! खडकवासला अन् वरसगाव धरणं फुल भरली; मुठा नदीत विसर्ग सुरू
NEET PG 2026: परीक्षा एकाच सत्रात, प्रत्येक प्रश्नासाठी अतिरिक्त वेळ, घराजवळ केंद्र निवडण्याची मुभा; NEET PG 2026 परीक्षेसाठी नियमांमध्ये मोठा बदल
परीक्षा एकाच सत्रात, प्रत्येक प्रश्नासाठी अतिरिक्त वेळ, घराजवळ केंद्र निवडण्याची मुभा; NEET PG 2026 परीक्षेसाठी नियमांमध्ये मोठा बदल
Guhagar Kasturi Cat rare: गुहागरच्या शाळेत जंगलातील दुर्मिळ कस्तुरी मांजर शिरलं, सगळेच अवाक झाले
गुहागरच्या शाळेत जंगलातील दुर्मिळ कस्तुरी मांजर शिरलं, सगळेच अवाक झाले
तमिळनाडू सीएम थलापती विजय यांच्याविरोधात 2031 मध्ये भिडू आत्ताच ठरला? विजय यांच्या ज्योतिषानेच केली भविष्यवाणी! म्हणाले, यांच्यामध्येच थेट टक्कर होणार
तमिळनाडू सीएम थलापती विजय यांच्याविरोधात 2031 मध्ये भिडू आत्ताच ठरला? विजय यांच्या ज्योतिषानेच केली भविष्यवाणी! म्हणाले, यांच्यामध्येच थेट टक्कर होणार
Abhijeet Dipke: 'अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीची चौकशी करा, मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी पैसा कसा पुरवला?' निवडणूक आयोगासह टॅक्स अधिकाऱ्यांना सुद्धा कोणी लिहिलं पत्र?
'अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीची चौकशी करा, मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी पैसा कसा पुरवला?' निवडणूक आयोगासह टॅक्स अधिकाऱ्यांना सुद्धा कोणी लिहिलं पत्र?
Ambernath Shiv Sena News: 'आमदार संध्याकाळी फार्म हाऊसवर जाऊन बसतात'; अंबरनाथमध्ये शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस पुन्हा उफाळली, शहरप्रमुखांची आमदार किणीकरांवर बोचरी टीका
'आमदार संध्याकाळी फार्म हाऊसवर जाऊन बसतात'; अंबरनाथमध्ये शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस पुन्हा उफाळली, शहरप्रमुखांची आमदार किणीकरांवर बोचरी टीका
Maharashtra Freedom of Religion Act 2026: महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा राज्यात लागू; कायद्याचे उल्लंघन केल्यास सात वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद
महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा राज्यात लागू; कायद्याचे उल्लंघन केल्यास सात वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद
Embed widget