नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी काही दिवसांपूर्वी घोषणा केली की, जुलै 2021 पर्यंत पाचपैकी एका भारतीयाला कोरोना व्हायरसची लस देण्यात येईल. केंद्रीय मंत्र्यांनी काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं की, 2021 च्या पहिल्या तीन महिन्यांमध्ये देशात कोरोना व्हायरसवरील प्रभावी वॅक्सिन उपलब्ध होईल. भारतासह संपूर्ण जगभरात कोरोना व्हायरसच्या वॅक्सिनवर वेगाने काम सुरु आहे. दरम्यान, आतापर्यंत हे समजू शकलेलं नाही की, कोणतं वॅक्सिन आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. जागतिक स्तरावर सातपेक्षा अधिक कोरोना लसींची चाचणी अंतिम टप्प्यात आहे. जाणून घेऊया कोरोना व्हायरस वॅक्सिनसंदर्भातील काही अपडेट्स...


वयोवृद्धांवरही परिणामकारक Moderna ची कोरोना लस


कोरोना व्हायरस वयोवृद्धांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती तयार करते की, नाही हा एक गंभीर प्रश्न आहे. कोरोना व्हायरससाठी Moderna Inc ने तयार केलेली वॅक्सिन mRNA 1273 चा वयोवृद्धांवरही सकारात्मक परिणाम दिसून आला आहे. अमेरिकेची जैव प्रौद्योगिकी कंपनी मॉडर्ना लवकरच आपली कोरोना वॅक्सिन बाजारात आणणार आहे. अमेरिकेत एमआरएनए-1273 वॅक्सिनच्या तिसऱ्या टप्प्यात 30 हजार सदस्य सहभागी झाले होते. एका अध्ययनाच्या 56 किंवा त्यापेक्षा अधिक वर्षाच्या 40 प्रौढ लोकांमध्ये मॉर्डना वॅक्सिनचे कोणतेही साइड-इफेक्ट नाहीत.


न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिन (NEJM) मध्ये प्रकाशित वॅक्सिनच्या पहिल्या टप्प्यातील चाचणीनंतर सहभागी सदस्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर अँन्टीबॉडिज विकसित झाल्या. मॉर्डनाची वॅक्सिन पुढच्या वर्षीच्या मध्यापर्यंत लोकांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. अनेक देशांमध्ये वॅक्सिनसाठी कंपनीतून आधीपासूनच करार करण्यात आले आहेत.


कोवॅक्सिन तिसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी तयार


हैदराबाद स्थित भारत बायोटेकमध्ये आता दोन कोविड-19 लसींवर काम सुरु आहे, ज्यामध्ये कोवॅक्सिनची चाचणी दुसऱ्या टप्प्यात आहे. कोवॅक्सिनची चाचणी वेगाने सुरु आहे. दरम्यान संशोधनातून निष्पन्न झालं आहे की, ही लस सहभागी सदस्यांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती तयार करण्यासाठी सक्षम आहे. आयसीएमआरसोबत एकत्र येत भारत बायोटेक कोरोना वॅक्सिन तयार करत आहे. हे वॅक्सिन आपल्या तिसऱ्या टप्प्यातील ट्रायलसाठी तयार आहे.


ऑक्सफर्ड युनिवर्सिटीचं वॅक्सिन


ऑक्सफोर्ड युनिवर्सिटीच्या वॅक्सिन प्रोजेक्टमध्ये स्वीडनची फार्मा कंपनी एस्ट्राजेनेका देखील सहभागी आहे. या वॅक्सिनचं तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल सुरु आहे. नव्या माहितीनुसार, वॅक्सिन लवकरच तयार होणार आहे. डिसेंबरपर्यंत लोकांसाठी सुरुवातीचे डोस उपलब्ध करण्यात येतील. दरम्यान पुढच्या सहा महिन्यांतच सर्वांसाठी डोस उपलब्ध करण्यात येतील. ऑक्सफर्ड युनिवर्सिटीची रिसर्च टीम वर्षाअखेरपर्यंत ब्रिटनची नियामक संस्था 'मेडिसिंस अँड हेल्थकेयर प्रोडक्ट्स रेगुलेटरी एजंन्सी' (एमएचआरए)कडे रजिस्ट्रेशनसाठी आवेदन करणार आहे.


भारतासह अनेक देशांमध्ये या लसीसाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. ही लस भारतात कोविशिल्ड नावाने विकण्यात येणार आहे. सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडियाच्या अनुमानानुसार, या लसीचा एक डोस 250 रूपयांना विकण्यात येणार आहे.


रशियन वॅक्सिनच्या तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायलला मंजूरी


रशियाने ऑगस्टमध्ये 'स्पुतनिक V' ही कोरोनावरील लस लॉन्च केली आहे. तसेच कोरोनावरील प्रभावी लस तयार करणारा रशिया हा पहिला देश ठरला आहे. दरम्यान या वॅक्सिनसंदर्भात अनेक अफवा पसरवण्यात येत आहेत. जर सर्वकाही ठिक असेल तरच वॅक्सिन जानेवारी 2021 पर्यंत जनतेसाठी उपलब्ध करण्यात येईल. 'स्पुतनिक V'वॅक्सिनला मॉस्को स्थित गामालेया रिसर्च इंस्टीट्यूटच्या संशोधकांनी आणि संरक्षण मंत्रालयाने एकत्र येत तयार केलं आहे.


रशियाच्या सॉवरेन वेल्थ फंडने भारताला कोरोना व्हायरसची वॅक्सिन 'स्पुतनिक V'चे 10 कोटी डोस देण्यासाठी करार केला आहे. रशिय डायरेक्ट इन्व्हेसमेंट फंड (आरडीआईएफ)ने भारतात लस पुरवण्यासाठी दिग्गज कंपनी डॉ. रेड्डीज लॅबसोबत करार केला आहे. रेड्डीज लॅबोरेटरीजने रशियन कोविड-19 वॅक्सिन 'स्पुतनिक V'चं भारतात मानवी शरीरावर तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायल मंजूरी प्राप्त करण्यासाठी भारतीय औषधी महानियंत्रक (डीसीजीआई) मध्ये आवेदन करण्यात आलं आहे.


कोरोना वॅक्सिनसाठी भारत बायोटेकचा वॉशिंग्टन युनिवर्सिटीसोबत करार


हैदराबाद स्थित भारत बायोटेकने वॉशिंग्टन युनिवर्सिटीच्या स्कूल ऑफ मेडिसिनसोबत कोविड-19 वॅक्सिन-नोवल चिम्प एडीनोवायरस (चिंपांजी एडीनोवायरस) एका लायसन्स करारावर स्वाक्षरी केली आहे. भारत बायोटेक नावामार्फत एडेनोवायरस वॅक्सिनच्या आता एका टप्प्याचं उत्पादन करण्याचं काम सुरु आहे. देशात सध्या ही लस पहिल्या टप्प्याती परिक्षणात आहे. याव्यतिरिक्त देशात जायंडस कॅडिला हेल्थ केअर लिमिटेड आणि सीरम इंस्टिट्यूट पुणे या वॅक्सिनचंही ट्रायल सुरु आहे.