नवी दिल्ली : देशातील पहिली एमआरएनए आधारित कोरोना लसीवक काम करण्याऱ्या पुण्यातील बायो टेक्नोलॉजी कंपनी जेनोवा बायोफार्मास्युटिकल्स लिमिटेडला दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायलसाठी मंजुरी मिळाली आहे. कंपनीने पहिल्या टप्प्यातील वॅक्सीन ट्रायल पूर्ण केले आहे. पहिल्या चाचणीचा अहवाल ड्रग कंट्रोलर स्टैंडर्ड कंट्रोल ऑर्गेनाइजेशनच्या कमिटीकडे देखील पाठवण्यात आला होता. कमिटीने पहिल्या चाचणीच्या परीक्षणात वॅक्सीन HGCO19 सुरक्षित आणि इम्युनोजेनिक असल्याचे निष्कर्ष काढले. त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणीला देखील परवानगी दिली आहे.
HGCO19 एमआरएनए बेस्ड कोविड 19 वॅक्सीनच्या दुसऱ्या टप्प्यातील चाचणी जवळपास 10-15 ठिकाणी केली आहे. तर तिसऱ्या टप्प्यातील चाचणी 22-27 जागांवर केली जाणार आहे.
वॅक्सीनच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला परवानगी मिळाल्यानंतर डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नोलॉजीचे सचिव डॉ रेणु स्वरूप म्हणाले, ही देशासाठी अभिमानाची गोष्ट असून देशात पहिल्या एमआरएनए-आधारित वॅक्सीन सुरक्षित आहे. त्यामुळे त्याच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला परवानगी दिली. आम्हाला खात्री आहे की, फक्त देशासाठी नाही तर जगासाठी देखील ही एक महत्त्वपूर्ण वॅक्सीन ठरणार आहे.
देशातील 1.6 कोटी लोकांना वेळेत दुसरा डोस नाही
देशातील कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी लसीकरणाचा कार्यक्रम जोरात सुरु असल्याचं केंद्र सरकार सांगतंय. पण लसीचा पहिला डोस घेतलेल्या 1.6 कोटी लोकांना त्यांचा दुसरा डोस वेळत मिळाला नसल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांचा सर्वाधिक भरणा असल्याची माहितीही मिळतेय. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत कोरोना लसीचे 58.82 कोटी डोस देण्यात आले आहेत. त्यामधील पहिला डोस घेतलेल्या किमान 1.6 कोटी लोकांना 16 आठवड्यांच्या आत दुसरा डोस मिळाला नसल्याचं समोर आलं आहे. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्या एक कोटीहून अधिक आहे. उरलेल्या नागरिकांमध्ये 45 वर्षांवरील नागरिकांची संख्या जास्त आहे.