नवी दिल्ली : एकीकडे खाद्य तेल आणि डाळीच्या किंमतीमध्ये वाढ होत असताना पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती 15 पैशांनी उतरल्या आहेत. मुंबईत पेट्रोलची किंमत  107. 52 रुपये प्रति लिटर आहे, तर डिझेलची किंमत 96.48 रुपये प्रति लिटर आहे. तर देशाच्या राजधानीत पेट्रोलची किंमत 101.49 रुपये प्रति लिटर, तर डिझेलची किंमत 88.92 रुपये प्रति लिटर आहे.


आजचे इंधनाचे दर


शहरं        पेट्रोलची किंमत  डिझेलची किंमत 
दिल्ली       101.49              88.92
मुंबई         107.52              96.48
चेन्नई         99.20               93.52
कोलकाता  101.82             91.98


जुलै महिन्यातील वाढ
जुलै महिन्यात आतापर्यंत पेट्रोलच्या किमती 9 वेळा आणि डिझेलच्या किमतींमध्ये 5 वेळा वाढ झाली आहे. तसेच जुलै महिन्यात एका दिवशी डिझेलच्या किमतीत काही प्रमाणात घट झाल्याचं पाहायला मिळालं होतं. यापूर्वी मे आणि जून महिन्यात इंधनाच्या किमतींमध्ये 16-16 वेळा वाढ झाली होती. 4 मेनंतर आतापर्यंत राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर 11.44 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचे दर 09.14 रुपये प्रति लिटर महाग झालं आहे.


पेट्रोल आणि डिझेलचे दर कुठे आणि कसे पाहाल?
इंडियन ऑईलचं IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.


इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर सोप्या पद्धतीने पाहता येतील.


पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत). 


महत्वाच्या बातम्या :