नवी दिल्ली : कोरोना व्हायरसशी लढणाऱ्या सर्वांसाठी तब्लिगी जमातीच्या मरकजमध्ये सहभागी झालेले लोक चिंतेचा विषय ठरत आहेत. तब्लिगी जमातीच्या मरकजमध्ये सहभागी झालेल्या अनेक लोकांना कोरोना झाल्याचं निष्पन्न होत असून त्यामुळे देशातील कोरोनाचा ग्राफ सतत वाढत आहे. आतापर्यंत देशामध्ये एकूण 3000 पेक्षा अधिक लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यामध्ये 647 लोक मरकजमध्ये सहभागी झाले होते.
गाझियाबादमध्ये डॉक्टर्स, नर्ससोबत तब्लिगींचं गैरवर्तन
तब्लिगी जमातीच्या काही लोकांना कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे त्यांना गाझियाबाद येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या व्यक्ती तिथे डॉक्टर्स आणि नर्ससोबत गैरवर्तन करत असल्याचं समोर आलं आहे. यासंदर्भात उत्तर प्रदेश सरकारने कठोर पावलं उचलली आहेत. यासंदर्भात बोलताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, 'ही लोक मानवतेवर काळिमा फासत आहेत. यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. पुढे बोलताना योगी आदित्यनाथ म्हणाले की, 'ही लोक नाही कायदा मानणार, नाही व्यवस्था मानणार, हे मानवतेचे दुश्मन आहेत. या लोकांनी महिला डॉक्टर्स, नर्ससोबत जे केलं आहे, तो गुन्हा आहे. यांच्यावर एनएसए लावण्यात येईल. आम्ही यांना सोडणार नाही.'
दरम्यान, गाझियाबादमधील एका हॉस्पिटलमध्ये तब्लिगी जमातीच्या काही लोकांना आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात आलं आहे. परंतु, त्यांच्या वागण्याची पद्धत फार विचित्र आहे. हॉस्पिटलमधील डॉक्टर्स आणि नर्सनी असा आरोप केला आहे की, 'तब्लिगी स्टाफ आणि नर्ससमो अश्लील गाणी ऐकतात आणि विचित्र इशारे करतात. एवढचं नाहीतर डॉक्टर्स आणि नर्सकडून ते बीडी किंवा सिगारेटची मागणीही करतात. त्यामुळे इथून पुढे त्यांच्यावर उपचार फक्त पुरूष कर्मचारी करणार असून त्यांना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्यात आले आहे.
पाहा व्हिडीओ : क्वॉरंटाईन केलेले दहा तबलिगी शिरूरमधून पळाले, सर्वत्र खळबळ
960 विदेशी लोकांचा वीजा रद्द
दिल्लीतील निजामुद्दीन परिसरात तब्लिगी जमातीच्या धार्मिक कार्यक्रमाबाबत समजल्यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने कठोर पावलं उचलली आहेत. वीजाच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी 960 विदेशई लोकांना ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्यात आलं आहे. त्याचबरोबर त्यांचा भारीतय विजा रद्द करण्यात आला आहे. तसेच या लोकांविरोधात आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.
Nizamuddin Markaz | 'मरकज' प्रकरणी मौलानासह काही जणांवर गुन्हा दाखल
तब्लिगींचे प्रमुख मौलाना साद गायब
दिल्लीतील मरकजमध्ये धार्मिक कार्यक्रमाच्या आयोजनावरुन मौलाना मोहम्मद साद कांधलवी आणि तब्लिगी जमातच्या इतर काही जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महामारी कायदा 1897 आणि भारतीय दंड विधानांच्या कलमांनुसार गुन्ह्याची नोंद झाली आहे. मरकजमध्ये मार्च महिन्यात एका धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि तोच कार्यक्रम देशात कोरोना व्हायरसच्या प्रसाराचा प्रमुख स्रोत बनला. COVID-19 च्या पार्श्वभूमीवर निजामुद्दीच्या मरकजमध्ये सर्व कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली होती. परंतु आदेशाचं उल्लंघन करत कार्यक्रमाचं आयोजन झालं. हे प्रकरण दिल्ली क्राईम ब्रान्चकडे सोपवण्यात आलं असून लवकरच अटक करण्यात येणार होते. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 28 मार्चनंतर मौलाना सादला कोणीच पाहिलेलं नाही.
तबलिगी जमात म्हणजे काय?
सुन्नी पंथीयांची धर्म प्रसार करणारी संघटना आहे. जागतिक पातळीवर सुन्नी मुस्लिमांचे संघटन करणे आणि सुन्नी पंथाचा विस्तार करणे हे जमातचे मुख्य उद्दिष्ट. सुन्नी पंथाकडे चला हा त्यांचा नारा आहे. 1927 मध्ये भारतातच म्हणजे मेवातमध्ये मोहम्मद इलियास यांनी तबलिगी जमातची स्थापना केली. 20 व्या शतकातील मुस्लीम जगतात हे सर्वात प्रभावी धर्म संघटन समजले जाते.
#Markaz | निजामुद्दीनमधलं 'मरकज' दिल्लीतल्या कोरोनाचं केंद्र, 'मरकज' म्हणजे नेमकं काय?
मरकज म्हणजे काय?
दिल्लीतील निजामुद्दीन येथे जे 'मरकज' (उर्दू शब्द) सुरु होतं त्याला तब्लिक जमातीत 'संस्थान' असं म्हणतात. प्रत्येक शहरात तब्लिक जमातीच्या मशिदी असतात. त्या मशिदींपैकी एक मुख्य मशीद ही मरकज असते अर्थात त्याला संस्थान म्हणतात. (उदा- पिंपरी चिंचवड शहरात एकूण 80 तब्लिक जमातीच्या मशिदी आहेत, त्यांची एका मुख्य मशिदीमध्ये सर्वांना माहिती जमा करावी लागते. कोण-कुठं-कधी आणि किती दिवस बाहेरच्या शहरात-राज्यात जमातीसाठी जातात, अशी माहिती तिथं द्यावी लागते) देशातील या सर्व मरकजची शिखर संस्था ही दिल्लीतील निजामुद्दीन येथे आहे. इथे परदेशात जमातीला गेलेल्या आणि तिथून परतलेल्या प्रत्येक मुस्लिम तब्लिकी बांधवांना माहिती द्यावी लागते. परदेशातून निजामुद्दीन मरकजमध्ये रिपोर्ट केल्यानंतर तिथून प्रत्येकाला विविध राज्यातील शहरात प्रबोधनासाठी पाठवले जाते. पण कोरोनामुळं प्रत्येकाला आपापल्या गावी पाठवण्यात आलं. मरकजमध्ये देशव्यापी कॉन्फरन्सही होत असतात. या जमातीला जाण्याचा कार्यकाळ हा 3 दिवस ते 4 महिन्यांइतका असतो, या जमातीमध्ये प्रबोधन केले जाते. (ही माहिती पिंपरी चिंचवडमधील मुस्लिम समाजातील अभ्यासू व्यक्तीकडून घेतलेली आहे.)
दरम्यान, 3000 हून अधिक लोक एक मार्च ते 15 मार्चपर्यंत या कार्यक्रमात सहभागी झाले होते. स्थानिक लोकांनी याबाबत बोलताना सांगितले की, हा कार्यक्रम संपल्यानंतरही मोठ्या संख्ेने लोक मरकजमध्ये थांबले होते. सध्या कोरोनामुळे देशात लॉकडाऊन करण्यात आला आहेो. तसेच कोणत्याही धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्याची परवानगी नाही.
संबंधित बातम्या :
तबलिगी जमातच्या लोकांनी माफी मागावी; काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांची मागणी
दिल्लीतील निजामुद्दीन कोरोनासाठी हॉटस्पॉट घोषित, 'मरकज' चा संपूर्ण परिसर सील