Coronavirus updates : देशात अजूनही कोरोनाचा संसर्ग फैलावत आहे. मागील 24 तासांत देशांमध्ये 7 हजार 992 कोरोनाबाधित आढळले आहेत. तर, 393 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात ओमायक्रॉय (Omicron) बाधितांची संख्या वाढली आहे. 


आतापर्यंत 4 लाख 75 हजार 128 जणांचा मृत्यू


केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, आता देशात सक्रिय रुग्णांची संख्या 93 हजार 277 झाली आहे. त्याचबरोबर या महासाथीमुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या 4 लाख 75 हजार 128 झाली आहे. आकडेवारीनुसार, काल ९२६५ बरे झाले होते. आतापर्यंत ३ कोटी ४१ लाख १४ हजार ३३१ लोक संसर्गमुक्त झाले आहेत.


देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 131 कोटींहून अधिक कोरोनाविरोधी लसींचे डोस देण्यात आले आहेत. काल ७६ लाख ३६ हजार ५६९ डोस देण्यात आले, त्यानंतर आतापर्यंत १३१ कोटी ९९ लाख ९२ हजार ४८२ लसीचे डोस देण्यात आले आहेत.


देशात ओमायक्रॉनबाधितांची संख्या वाढली


कोरोना महासाथीच्या काळात कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन बाधितांची संख्या वाढत आहे. ओमायक्रॉनची 32 बाधित आढळले आहेत. 


देशातील 53 टक्के प्रौढांचे पूर्ण लसीकरण


केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सांगितलं की, देशातील 53 टक्के प्रौढ लोकांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. 


राज्यात 695 बाधितांची नोंद


कोरोनाबाधितांच्या  (Coronavirus) दैनंदिन रुग्णसंख्येत चढ उतार पाहायला मिळत आहे. राज्यात शुक्रवारी 695 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 631  रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 64 लाख 90  हजार 936 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.72 टक्के आहे. 


 







फायझरचा बूस्टर डोस ओमायक्रॉनवर प्रभावी असल्याचा दावा


 फायझर (Pfizer) कोविड लसीचा (Covid Vaccination) तिसरा डोस म्हणजेच बूस्टर डोस (Booster Dose) कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटवर (Omicron Variant) 90 टक्के प्रभावी असल्याचं एका संशोधनात उघड झाले आहे. यामुळे मृत्यूदर 90 टक्क्यांनी कमी होण्यास मदत होईल, असे इस्त्रायलमध्ये केलेल्या रिसर्चमध्ये समोर आले आहे. 'द न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिन'मध्ये गुरुवारी प्रकाशित झालेल्या संशोधन अहवालात म्हटले आहे की, या अभ्यासात 50 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या व्यक्तींचा समावेश करण्यात आला ज्यांना किमान पाच महिन्यांपूर्वी फायझर लसीचे दोन डोस मिळाले होते. संशोधनात सहभागी 8,43,208 लोकांचे दोन गटांमध्ये वर्गीकरण करण्यात आले होते. या गटांपैकी एकामध्ये बूस्टर डोस मिळालेल्या लोकांचा समावेश होता, तर दुसऱ्या गटात बूस्टर डोस न मिळालेल्या लोकांचा समावेश होता. या दोन गटांच्या अभ्यासाच्या निष्कर्षांची एकमेकांशी तुलना करण्यात आली.


इतर महत्त्वाच्या बातम्या: