नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासात 20 हजार 799 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे तर 180 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. गेल्या 24 तासात देशातील 26 हजार 718 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. महत्वाचं म्हणजे देशातील सक्रिय रुग्णसंख्या घटली असून ती 0.78 टक्के इतकी कमी झाली आहे. तसेच रुग्ण बरे होण्याचं प्रमाणही गेल्या दीड वर्षातील सर्वाधिक म्हणजे 97.89 इतकं झालं आहे. 


त्या आधी, शनिवारी देशात 22 हजार 842 नव्या रुग्णांची भर पडली होती तर 244 जणांचा मृत्यू झाला होता. देशात आतापर्यंत 90.79 कोटी लोकांना कोरोना लसीचा डोस देण्यात आला आहे. 


 






राज्यातील स्थिती 
राज्यातील कोरोनाची दुसरी लाट आता नियंत्रणात येताना दिसत आहे. राज्यात रविवारी 2,692 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 2 हजार 716 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 63 लाख 80 हजार 670 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.28 टक्के आहे. दरम्यान, कोरोना नियंत्रणात आल्याने आजपासून राज्यातील शाळा अनलॉक करण्यात येत आहे.


महत्वाच्या बातम्या :